अहमदाबादः २००८मध्ये अहमदाबाद येथे झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील ३८ आरोपींना विशेष न्यायालयाने फाशी तर ११ जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
अहमदाबादः २००८मध्ये अहमदाबाद येथे झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील ३८ आरोपींना विशेष न्यायालयाने फाशी तर ११ जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. या बॉम्बस्फोटात ५६ जण ठार व २००हून अधिक जण जखमी झाले होते. हा बॉम्बस्फोट इंडियन मुजाहिदीन अंतर्गत कार्यरत असलेल्या सिमीकडून घडवून आणल्याचा पोलिसांचा आरोप होता. २००२च्या गोध्रा हत्याकांडाचा सूड म्हणून हे बॉम्बस्फोट घडवून आणले असेही पोलिसांचे म्हणणे होते.
या खटल्यातील आरोपी असलेल्या ४८ जणांवर प्रत्येकी २.८५ लाख रु.चा दंड ठोठावण्यात आला असून बॉम्बस्फोटातील मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी १ लाख रु., गंभीर जखमींना प्रत्येकी ५० हजार रु. व किरकोळ जखमींना प्रत्येकी २५ हजार रु. द्यावेत असे न्यायालयाने निकालपत्रात म्हटले आहे.
हा निर्णय जाहीर करताना अहमदाबाद, दिल्ली, भोपाळ, गया, बंगळुरू, केरळ व मुंबई येथील कारागृहात ठेवण्यात आलेले या खटल्यातील सर्व आरोपी व्हीडिओ कॉन्फरन्सद्वारे उपस्थित होते.
गेली १४ वर्षे हा खटला सुरू होता. शुक्रवारी न्या. ए. आर. पटेल यांनी आपला निर्णय जाहीर करताना एखाद्या खटल्यात एवढ्या मोठ्या संख्येने फाशी सुनावण्याचे व ११ जणांना जन्मठेप देण्याचे हे पहिलेच प्रकरण असल्याचे सांगितले. या खटल्याचे निकालपत्र ७००० पानांचे आहे.
गेल्या ८ फेब्रुवारीला न्यायालयाने ४९ जणांना दोषी ठरवले होते व २८ जणांची पुराव्याअभावी निर्दोष मुक्त झाल्याचे जाहीर केले होते.
२६ जुलै २००८मध्ये अहमदाबाद शहरात ७० मिनिटांच्या कालावधीत लागोपाठ २१ बॉम्बस्फोट झाले होते.
(छायाचित्र – मालेगाव बॉम्बस्फोट )
मूळ बातमी
COMMENTS