कर्नाटकात मुस्लिम विद्यार्थ्यांची संख्यामोजणी सुरू

कर्नाटकात मुस्लिम विद्यार्थ्यांची संख्यामोजणी सुरू

नवी दिल्लीः राज्यातल्या खासगी व सरकारी शिक्षणसंस्थांमध्ये प्रवेश घेतलेल्या मुस्लिम विद्यार्थ्यांची संख्या मोजण्याचे काम कर्नाटक राज्य सरकारकडून सुरू अ

शासन बदललं, प्रशासन बदला!
अ‍ॅमेझॉन वर्षावनाच्या आगीमुळे साओ पावलो अंधारात
तत्त्वचिंतनाचे शत्रू

नवी दिल्लीः राज्यातल्या खासगी व सरकारी शिक्षणसंस्थांमध्ये प्रवेश घेतलेल्या मुस्लिम विद्यार्थ्यांची संख्या मोजण्याचे काम कर्नाटक राज्य सरकारकडून सुरू असल्याचे वृत्त डेक्कन हेराल्डने दिले आहे. हे काम प्रत्येक खासगी व सरकारी शाळांच्या प्रशासनाला दिले असून १ ली ते १० पर्यंत शिक्षण घेत असलेल्यांची माहिती सरकारला हवी आहे.

सध्या प्रसार माध्यमात शिक्षण घेत असलेल्या मुस्लिम विद्यार्थ्यांच्या आकडेवारीवरून चर्चा सुरू आहे. हा आकडा नेमका किती आहे, याची सरकारला माहिती हवी असल्याचे राज्याचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण मंत्री बी. सी. नागेश यांनी सांगितले. प्रसार माध्यमांमधून येणाऱ्या आकडेवारीत तफावत आहे. जे विद्यार्थी न्यायालयाचा आदेश उल्लंघन करत आहेत त्यांची माहिती हवी आहे. तसेच अशा विषयामुळे मुलांचे अभ्यासावरचे लक्ष विचलित होत आहे का, याची माहिती सरकारला हवी आहे. जे विद्यार्थी वर्गात उपस्थित होत असतील तर ती आकडेवारी नेमकी किती आहे, याची माहिती सरकारला हवी असल्याचे नागेश यांचे म्हणणे आहे.

नागेश यांच्या खात्यातील एका अधिकाऱ्याने सांगितले की, लोकप्रतिनिधी व उच्च न्यायालयाकडून अशी आकडेवारी मागण्याची शक्यता असल्याने सरकारने हा निर्णय घेतला आहे.

पण सरकारच्या या निर्णयावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहे. बंगळुरूतील एका खासगी क़ॉलेजच्या प्राचार्याने सांगितले की, हिजाब घालून वर्गात जाणाऱ्या मुस्लिम मुलींची आकडेवारी सरकारला मिळाल्याने राज्यातील किती कॉलेज या विषयावर संवेदनशील आहेत याचा अंदाज सरकारला मिळणार आहे.

१८ फेब्रुवारीपर्यंत १६२ मुलींनी उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन न केल्याने त्यांना शाळा व कॉलेज प्रशासनाने घरी पाठवल्याचे सरकारचे म्हणणे आहे.

कर्नाटकात सध्या हिजाब घातलेल्या मुस्लिम मुलींना शाळा व कॉलेजात प्रवेश बंदीचे प्रकार दिसून आले आहेत. हे प्रकरण न्यायप्रविष्टही आहे. काही दिवसांपूर्वी कर्नाटक उच्च न्यायालयाने शैक्षणिक संस्थांमध्ये कोणत्याही धर्माचे कपडे घालून येऊ नये, असे अंतरिम आदेश दिले आहेत. हा आदेश मानून शाळा व कॉलेज प्रशासनाकडून हिजाब घातलेल्या मुलींना हिजाब काढल्यासच प्रवेश देण्यात येईल, असे सांगण्यात येत आहे.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0