गुजरातमध्ये २ दलित युवकांना बेदम मारहाण

गुजरातमध्ये २ दलित युवकांना बेदम मारहाण

अहमदाबाद : शहरातील साबरमती टोल नाका परिसरात रविवारी काही जणांनी दोन दलित युवकांना बेदम मारहाण करत एका युवकाचे कपडे उतरवल्याची संतापजनक घडली. या घटनेचा

एचके आर्ट्स कॉलेजच्या प्राचार्यांनी राजीनामा का दिला?
बुलेट ट्रेनसाठी ५४००० तिवरांची कत्तल
अहमदाबादेत मुख्य रस्त्यांवर मांसाहार बंदी

अहमदाबाद : शहरातील साबरमती टोल नाका परिसरात रविवारी काही जणांनी दोन दलित युवकांना बेदम मारहाण करत एका युवकाचे कपडे उतरवल्याची संतापजनक घडली. या घटनेचा एक व्हिडिओ सोमवारी सोशल मीडियात पसरल्याने त्याची तीव्र प्रतिक्रिया उमटली असून पोलिसांनी या प्रकरणी दोन जणांना ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शहरातील साबरमती टोलनाका परिसरात एका ढाब्यावर प्रगनेश परमार व जयेश हे दोन दलित युवक बसले होते. काही वेळाने ढाब्याचा मालक महेश ठाकोर व प्रगनेश यांच्यामध्ये बाचाबाची सुरू झाली. त्यानंतर महेश ठाकोरने काही लोकांना साथीला घेत प्रगनेश व जयेशला दंडुक्याने मारण्यास सुरुवात केली. या मारहाणीत एकाचे कपडेही उतरवण्यात आले व त्याला दंडुक्याने जबर मारहाण करण्यात आली.

नंतर या दोघा जखमींना शहरातील सिविल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेण्यात आले. या दोघांपैकी एकाची प्रकृती गंभीर असल्याचे समजते.

पोलिसांनी नंतर ढाब्याचा मालक महेश ठाकोर व शंकर ठाकोर यांच्याविरोधात आयपीसी कलम ३७० व अनु.जाती.जमाती (अत्याचार प्रतिबंधक)कायद्यांतर्गत गुन्हे दाखल केले असून महेश ठाकोर याला ताब्यात घेण्यात आले आहे. शंकर ठाकोर फरार झाला आहे.

वडगामचे आमदार जिग्नेश मेवाणी यांनी या घटनाप्रकरणातील दोषींना २४ तासात अटक न केल्यास अहमदाबाद बंद केला जाईल असा इशारा दिला आहे.

गेल्या सहा महिन्यात गुजरातमध्ये १२ ते १३ दलितांची झुंडशाहीने हत्या केली आहे.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0