कोरोना – डॉक्टरांना घरे खाली करण्यास घरमालकांचा दबाव

कोरोना – डॉक्टरांना घरे खाली करण्यास घरमालकांचा दबाव

नवी दिल्ली – कोरोना विषाणू संक्रमणाचे आव्हान स्वीकारून शेकडो रुग्णांचे प्राण वाचवणार्या दिल्लीतल्या डॉक्टर, नर्स व रुग्णालयातील कर्मचार्यांना घरे सोडू

टोक्यो ऑलिम्पिक एक वर्ष पुढे ढकलले
कोरोनामुक्त गाव पुरस्कार योजना
कोरोनाचे संकट कायम, जबाबदारीची गरजःमुख्यमंत्री

नवी दिल्ली – कोरोना विषाणू संक्रमणाचे आव्हान स्वीकारून शेकडो रुग्णांचे प्राण वाचवणार्या दिल्लीतल्या डॉक्टर, नर्स व रुग्णालयातील कर्मचार्यांना घरे सोडून जावे यासाठी त्यांच्या घरमालकांकडून धमकावले जात असल्याच्या घटना दिसून आल्या आहेत. या प्रकरणी एम्सने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना एक पत्र पाठवून एम्समध्ये काम करणार्या व भाड्याने राहात असलेल्या डॉक्टर, नर्स आणि वैद्यकीय कर्मचार्यांना त्यांचे घरमालक घर सोडून जाण्यासाठी त्रास, धमकी व प्रसंगी जबरदस्तीने घर खाली केले जात असल्याची तक्रार केली आहे.

या घटनेमुळे त्रस्त झालेल्या अनेक डॉक्टरांनी मंगळवारी रस्त्यावर निदर्शने केली. त्यांच्या मते रात्री कामावरून परत आल्यानंतर त्यांना इमारतींमध्ये प्रवेशच दिला गेला नाही. काहींना लगेचच घर खाली करण्यास घरमालक सांगत आहेत, तर काहींचे सामान रस्त्यावर दिसून आले. आमच्याकडे रहिवाशी, शेजारी संशयित नजरेने पाहात असून आमच्यामुळे कोरोनाचे संक्रमण पसरत असल्याचा हे लोक, घरमालक दावा करत आहेत, अशी तक्रार अनेक डॉक्टरांची, नर्स व अन्य आरोग्य सेवकांची आहे.

मंगळवारी एम्सचे संचालक डॉ. आदर्श प्रताप सिंह यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना एक पत्र लिहून या डॉक्टरांची व आरोग्य सेवकांची व्यथा त्यांच्याकडे मांडली आणि घरमालकांना असे आदेश देण्यावाचून सरकारने रोखावे अशी विनंती त्यांनी अमित शहा यांना केली.

या पत्राची दखल घेत शहा यांनी दिल्ली पोलिस आयुक्तांना डॉक्टरांच्या सुरक्षिततेची जबाबदारी घ्यावी व जे लोक आरोग्य सेवकांशी योग्य तर्हेने वर्तन करत नसतील त्यांना समज द्यावी असे निर्देश दिले आहेत.

दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांनीही या घटनेबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करत अशा काही तक्रारी असतील तर त्या आपल्याकडे पाठवून द्याव्यात असे सांगितले. कोरोनाशी सामना करणारे डॉक्टर आपले सर्वांचे प्राण वाचवत आहेत, ते मोठी जोखीम पत्करत असताना त्यांच्याशी घरमालकांनी असे वर्तन करणे अयोग्य असून या घरमालकांच्या घरातील कोणाला कोरोनाची लागण झाल्यास हेच डॉक्टर तुमच्या मदतीला येणार आहेत, याकडे केजरीवाल यांनी लक्ष वेधले.

एम्समध्ये दाखल झालेल्या कोरोना बाधित रुग्णांशी डॉक्टर, नर्स व अन्य आरोग्य कर्मचार्यांचा संपर्क राहत असल्याने त्यांच्याकडून इमारतींमधील अन्य रहिवाशांमध्ये ही साथ पसरू शकते, असे या घरमालकांचे म्हणणे आहे.

कोलकातामध्येही अशीच घडली घटना

कोलकात्यातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ कॉलरा अँड एंटेरिक डिसीझ या संस्थेत काम करणार्या ३० वर्षाच्या आरोग्य कर्मचारी महिलेला कोरोनाच्या भीतीमुळे घरमालकाने घरातून सामान खाली करण्यास सांगितले होते. त्यावर या संस्थेच्या प्रशासनाने हस्तक्षेप करून घरमालकाला समजावले.

सोमवारी कोलकात्यातील एका रुग्णालयात कोरोना संसर्गाने एका रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर या रुग्णालयात काम करणार्या १५ नर्सना त्यांच्या घरमालकाने घर खाली करण्यास सांगितले होते. त्यानंतर या नर्सना स्वतःसाठी वेगळे घर शोधावे लागले.

एका नर्सने आपले नाव न उघड करता असे सांगितले की, गेले कित्येक दिवस आम्ही ओव्हर टाइम काम करत आहोत, प्रचंड तणावात काम करावे लागते अशा मानसिक अवस्थेत आपला घरमालक घर खाली करण्यास सांगत असेल तर त्याचा धक्का खूप बसतो. आमचे नशीब असे की, आम्हाला रुग्णालय प्रशासनाच्या मदतीने एका ठिकाणी राहायला मिळाले.

गुजरातमध्ये डॉक्टर महिलेला रहिवाशांनी दिला त्रास

गुजरातमध्ये सूरत शहरातील न्यू सिव्हिल हॉस्पिटलमध्ये काम करणार्या डॉ. संजीवनी पाणीग्रही यांना त्या राहात असलेल्या बिल्डिंगमधील रहिवाशांच्या रागाला सामोरे जावे लागले. त्या मनोविश्लेषक म्हणून काम करतात. सोमवारी डॉ. पाणीग्रही यांनी एक ट्विट केले. या ट्विटमध्ये त्यांनी आपला अनुभव कथन केला. त्या म्हणतात, मी घरी पोहचल्यावर बिल्डिंगच्या प्रवेशद्वारावर सचिवाने तुम्ही घर लगेच खाली करा असे सांगितले. तुम्ही रोज बाहेर जाता, हे असे चालणार नाही, तुमचे वर्तन आम्ही सहन करणार नाही, तुम्हाला आम्ही इशारा देत आहोत, असे धमकावले.

डॉ. पाणीग्रही यांनी या अनुभवाचा ट्विट थेट पीएमओला टॅग केला. त्यानंतर अनेक डॉक्टर सहकार्यांनी मदतीचा हात दिला.

डॉ. पाणीग्रही आपले पती व दोन मुलांसह गेली दोन वर्षे या अपार्टमेंटमध्ये राहतात पण मंगळवारी अचानक सोसायटीतील रहिवाशांचे माझ्या बद्दलचे मत बदलले आणि त्यांच्या रागाला सामोरे जावे लागले, असे त्या म्हणाल्या.

मूळ बातमी   

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0