विनीत अगरवाल शारदा यांची ‘विषारी वायू’ थियरी नवीन असली तरी सध्याच्या संकटाचा दोष भारताच्या सीमेपलिकडे ढकलण्याचा प्रयत्न करणारे ते पहिले व्यक्ती नव्हेत.
भारतीय जनता पक्षाचे नेते विनीत अगरवाल शारदा यांचा असा विश्वास आहे, की हवेची घसरलेली गुणवत्ता ही भारतापुढची मोठी समस्या असली, तरी त्याचे कारण देशाच्या सीमेपलिकडे आहे. त्यांच्या मते चीन आणि पाकिस्तान ‘विषारी वायू’ सोडत आहेत व त्यामुळे भारतातील हवा प्रदूषित होत आहे.
“ही विषारी हवा कदाचित शेजारच्या एखाद्या देशातून येत असेल, जो तुम्हाला घाबरला आहे. मला वाटते पाकिस्तान किंवा चीनला आपली भीती वाटत असावी,” शारदा यांनी एएनआयला सांगितले. “पाकिस्तान विषारी वायू सोडत आहे का याचा आपण गंभीरपणे विचार केला पाहिजे.”
भाजप नेत्याच्या मते पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी देशाची सूत्रे सांभाळल्यापासून त्यांच्या ‘कठोर’ भूमिकेमुळे पाकिस्तान निराश झाला आहे. लष्कराद्वारे विजय मिळवणे शक्य नसल्यामुळे तो देश आता नवीन डावपेच खेळत आहे असे शारदा यांचे म्हणणे आहे.
“पाकिस्तानने भारताबरोबर जेव्हा जेव्हा युद्ध केले आहे, तेव्हा तो हरला आहे. आता पीएम मोदी आमि अमित शाह आल्यापासून पाकिस्तान निराश झाला आहे,” ते म्हणाले.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासह ज्यांनी ज्यांनी पंजाब आणि हरयाणा या शेजारच्या राज्यांमध्ये शारदा यांनी पिकाचे कापणीनंतरचे सड जाळल्यामुळे दिल्लीच्या प्रदूषणात वाढ झाली आहे असे म्हटले आहे त्या सर्वांवर शारदा यांनी टीका केली आहे. “शेतकरी हा आपल्या देशाचा कणा आहे. शेतकरी आणि उद्योगांना दोष देता कामा नये,” असे ते म्हणाले.
सध्याच्या राजवटीत सर्व समस्यांचे निराकरण होईल, ते पुढे म्हणाले, कारण मोदी आणि शाह हे ईश्वरापेक्षा कमी नाहीत. “हा कृष्ण आणि अर्जुनाचा काळ आहे. पंतप्रधान मोदीरूपी कृष्ण आणि अमित शाहरुपी अर्जुन मिळून सगळ्याची काळजी घेतील,” ते म्हणाले.
शारदा यांची ‘विषारी वायू’ थियरी नवीन असली तरी सध्याच्या संकटाचा दोष भारताच्या सीमेपलिकडे ढकलण्याचा प्रयत्न करणारे ते पहिले व्यक्ती नव्हेत. लाहोर आणि पाकिस्तानच्या इतर भागातली हवेची गुणवत्ता अतिशय घसरली आहे आणि दोन्ही देशांमधले राजकारणी आणि नोकरशहांनी एकमेकांना दोष देण्याचा प्रयत्न केला आहे
इमान मजेद यांनी द वायर मध्ये लिहिले होते त्याप्रमाणे, भारत आणि पाकिस्तान – आणि जगभरातल्या इतर देशांनीही – आत्ता या वेळी एकत्रितपणे डोक्याला डोकी घासली पाहिजेत आणि उपाय शोधला पाहिजे. पर्यावरणीय संकटे देशांच्या सीमांमध्ये राहत नाहीत – आणि त्यामुळे त्यांची कारणे आणि उपायही तसे असू शकत नाहीत. “भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी अनेक समस्यांवर एकमेकांशी चर्चा करणे गरजेचे आहे. हवामान हे त्या यादीत सर्वात वर असले पाहिजे, कारण ते त्यांच्या सीमांच्या दरम्यानच्या विद्युतभारित कुंपणाला जुमानत नाही,” मजेद म्हणतात.
COMMENTS