अमित शहा, राजनाथ नेहरु सोसायटीचे सदस्य

अमित शहा, राजनाथ नेहरु सोसायटीचे सदस्य

नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हे देशातील प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या नेहरु मेमोरियल म्युझियम अँड लायब्ररी (एनएम

देशात २०२४ अखेर एनआरसी पूर्ण : अमित शहा
कलम ३७१ला हात लावणार नाही : अमित शहा
आदरणीय गृहमंत्री, मला कोणत्या कायद्याखाली स्थानबद्ध केलेय?

नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हे देशातील प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या नेहरु मेमोरियल म्युझियम अँड लायब्ररी (एनएमएमएल) सोसायटीचे नवे सदस्य असतील. या संस्थेच्या कार्यकारिणीवरून काँग्रेसचे नेते जयराम रमेश, करण सिंग व मल्लिकार्जुन खरगे यांची नावे रद्द करण्यात आली आहे.

या संस्थेची नवी कार्यकारिणी अस्तित्वात यायला सहा महिने शिल्लक असतानाच बुधवारी नवे सदस्य म्हणून अमित शहा व राजनाथ सिंह यांना नियुक्त करण्यात आले. ही कार्यकारिणी पुढील पाच वर्षे राहील. या संस्थेचे मानद अध्यक्ष हे पंतप्रधान असतात. तर उपाध्यक्षपदी राजनाथ सिंग असतील.

गेल्या वर्षी सरकारने चार नवे सदस्य नियुक्त केले होते. त्यामध्ये प्रसिद्ध विचारवंत प्रताप भानू मेहता, अर्थतज्ज्ञ नितीन देसाई यांचा समावेश होता पण या दोघांनी तीन मूर्ती भवन इमारतीत भारतात होऊन गेलेल्या पंतप्रधानांचे म्युझियम करण्याच्या सरकारच्या प्रयत्नांना विरोध केला होता.  या दोघांनी राजीनामे दिले होते. त्यांच्या रिक्त जागी अमित शहा व राजनाथ सिंह यांची नियुक्ती झाली आहे.

नेहरु मेमोरियल कार्यकारिणी मंडळावर रिपब्लिकन टीव्हीचे संपादक अर्णव गोस्वामी यांना पूर्वी घेतले होते पण एक वर्षाच्या आत त्यांची नियुक्ती रद्द करण्यात आली. त्यानंतर पत्रकार राम बहादूर राय, माजी परराष्ट्रसचिव व सध्याचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर, भाजपचे राज्यसभा सदस्य विनय सहस्त्रबुद्धे यांना नियुक्त करण्यात आले होते.

सरकारने या वेळी कार्यकारिणीतील सदस्य संख्या ३४ वरून २८ इतकी कमी केली आहे. ज्या सदस्यांच्या नियुक्त्या रद्द केल्या आहेत त्यामध्ये माजी परराष्ट्रमंत्री एम. जे. अकबर, माजी लष्करप्रमुख व्ही. पी. माली, इन्फोसिसचे संस्थापक एन. नारायणमूर्ती, इतिहासकार नवज्योत लाहिरी, अर्थतज्ज्ञ बिबेक डेब्रॉय व अवकाश शास्त्रज्ञ के. कस्तुरीरंगन यांचा समावेश आहे.

नव्या नियुक्तीत अर्थमंत्री निर्मला सीतारामन, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरीयाल, माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर, परराष्ट्रराज्यमंत्री व्ही. मुरलीधरन,  सांस्कृतिक मंत्री प्रल्हाद पटेल, प्रसिद्ध पत्रकार रजत शर्मा, प्रसिद्ध जाहिरातगुरु, गीतकार प्रसून जोशी, पत्रकार स्वपन दासगुप्ता यांची नावे आहेत. त्याचबरोबर मोदी कॉमन मॅन्स पीएम इन २०१५- या पुस्तकाचे लेखक किशोर मकवाना, धोरणरचनाकार अनिर्बन गांगुली, कपिल कपूर, कमलेश जोशीपुरा, रिझवान काग्री, सच्चिदानंद जोशी अशा अन्य सदस्यांची नावे आहेत.

काँग्रेसचे अस्तित्व नगण्य

नेहरु मेमोरियलच्या कार्यकारिणीच्या नव्या पुनर्रचनेमुळे काँग्रेस सदस्यांचे या कार्यकारिणीतील स्थान अत्यल्प राहिले आहेत. या कार्यकारिणीत नियुक्त झालेले काँग्रेसचे सदस्य हे केवळ प्रतिनिधी म्हणून असतील. हे प्रतिनिधी कोण असतील त्याबाबतचा निर्णय काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्याकडे आहे.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: