‘आम्हाला फसवून नेले’

‘आम्हाला फसवून नेले’

शपथविधीसाठी फसवून नेल्याचे राष्ट्रवादीच्या आमदारांनी पत्रकारपरिषदेत सांगितले.

‘एमपीएससी’च्या सदस्यांची पदे ३१ जुलैपर्यंत भरणार
२० लाख शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांचे अनुदान
महाराष्ट्राच्या राजकारणात बिनचेहर्‍यांची सद्दी

आम्हाला फसवून शपथविधीसाठी नेले, आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार यांच्याबरोबरच आहोत, असे राष्ट्रवादीच्या तीन आमदारांनी आज पत्रकारपरिषदेत सांगितले.

दुपारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संयुक्त पत्रकारपरिषद घेतली. त्यावेळी ३ आमदारांनी येऊन खुलासा केला. डॉ राजेंद्र शिंगणे हे सिंदखेडराजा या ठिकाणचे राष्ट्रवादीचे आमदार आहेत. ते म्हणाले, “२२ नोव्हेंबरला रात्री १२ वाजता आम्हाला अजित पवार यांचा फोन आला आणि २३ तारखेला सकाळी धनंजय मुंडे यांच्या निवासस्थानी चर्चा करण्यासाठी बोलावण्यात आले. नेत्यांचा फोन असल्याने आम्ही सकाळी ७ वाजता मुंडे यांच्या निवासस्थानी पोहोचलो. तेथून आम्हाला दुसरीकडे चर्चेसाठी म्हणून थेट राजभवनावर नेण्यात आले. तिथे थोड्याच वेळात भाजपचे नेते आले. अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस आले. तातडीने राज्यपाल आले आणि ५ मिनिटातच शपथविधी उरकण्यात आला.”

शिंगणे म्हणाले, की त्यांना लगेच कळाले, की काहीतरी गडबड आहे. म्हणून शपथविधी संपताच ते तातडीने सिल्व्हर ओक या शरद पवार यांच्या निवासस्थानी आले. आपल्याला फसवून नेण्यात आले होते, पण आपण शरद पवार यांच्या बरोबरच आहोत, असे शिंगणे, संदीप क्षीरसागर आणि आणखी एका आमदाराने सांगितले.

तसेच अजून दोन आमदार परतले असल्याचे यावेळी सांगण्यात आले. दुपारी ४ वाजता राष्ट्रवादी काँग्रेस विधी मंडळ पक्षाची बैठक घेण्यात येणार असून, त्यावेळी अजित पवार यांच्यावर कारवाई केली जाईल, असेही पवार यांनी सांगितले.

आज सकाळी ८ वाजून ५ मिनिटांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री पदाची तर अजित पवार यांना उपमुख्यमंत्री पदाची शपथ दिली. अतिशय गोपनीय ठेवण्यात आलेला हा शपथविधी आज सकाळी पार पडला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करून फडणवीस आणि पवार यांचे अभिनंदन केले.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0