रामदेव बाबांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल कराःआयएमए

रामदेव बाबांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल कराःआयएमए

नवी दिल्लीः पतंजली आयुर्वेद उद्योगाचे प्रमुख व योगगुरू रामदेव बाबा यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी करणारे एक पत्र इंडियन मेडिकल असोस

जगणं शिकवून गेलेला माणूस
हिंदू आणि हिंदुत्व: रामदेवबाबांचा हास्यास्पद ‘विनोद’!
‘आध्यात्मिक’ वाहिन्यांचे अर्थकारण : भाग १

नवी दिल्लीः पतंजली आयुर्वेद उद्योगाचे प्रमुख व योगगुरू रामदेव बाबा यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी करणारे एक पत्र इंडियन मेडिकल असोसिएशने पंतप्रधान नरेंद्र मोदींना लिहिले आहे. रामदेव बाबा अलोपथीविरुद्ध व लसीकरणाविरोधात समाजात गैरसमज व अफवा पसरवत असून ते सरकारच्या कोविड संदर्भातल्या मार्गदर्शक तत्वांनाच आव्हान देत असल्याने त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हाच दाखल करणे योग्य असल्याचे या पत्रात नमूद करण्यात आले आहे.

आपल्या पत्रात आयएमएने म्हटले आहे की, देशातल्या केवळ ०.०६ टक्के लोकसंख्येला कोविड प्रतिबंधक दोन लसी मिळाल्या असून त्यानंतर या लोकांना कोरोनाची झालेली लागण अत्यंत नगण्य आहे, त्याच बरोबर ज्यांना लागण झालेली आहे अशा अत्यंत कमी रुग्णांना फुफ्फुसाच्या गंभीर आजारांनी ग्रासलेले आहे. सध्याच्या घडीला लसीकरणामुळेच देशातली लोकसंख्या कोरोनापासून सुरक्षित राहू शकते. अशी परिस्थिती असताना रामदेव बाबा अलोपथीची औषधे घेऊनही १००० हून अधिक डॉक्टर मरण पावले असल्याचे खोटे सांगत असल्याचा मुद्दा या पत्रात आहे. आम्ही सरकारने ठरवलेल्या मार्गदर्शक तत्वांचे पालन करत असून आरोग्य खाते, आयसीएमआरचे नियम पाळत आलेलो आहेत. यातून अलोपॅथीवरचे रामदेव बाबांचे आरोप हे सरकारला आव्हान असल्याचे या पत्रात म्हटले आहे.

रामदेवबाबांविरोधात १ हजार कोटींचा मानहानीचा दावा

दरम्यान, इंडियन मेडिकल असोसिएशनच्या उत्तराखंड राज्यातल्या शाखेने पतंजली आयुर्वेद उद्योगाचे सर्वेसर्वा योगगुरू रामदेव बाबा यांच्याविरोधात अलोपॅथी व अलोपॅथी चिकित्सेवर अवमानकारक टीका केल्या प्रकरणात एक हजार कोटी रु.चा मानहानीचा दावा ठोकला आहे. या संदर्भातील एक नोटीस आयएमएने रामदेव बाबांना धाडली आहे. आयएमएचे उत्तराखंड शाखेचे सचिव अजय खन्ना यांनी ६ पानांची एक नोटीस रामदेव बाबा यांना पाठवली असून त्यात अलोपॅथीचे २००० डॉक्टरांची प्रतिष्ठा व त्यांच्या प्रतिमेवर रामदेव बाबा यांनी हल्ला केल्याचा आरोप केला आहे.

रामदेव बाबा यांच्यावर आयपीसी ४९९ अंतर्गत कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली आहे. ही नोटीस मिळाल्यानंतर १५ दिवसांत रामदेव बाबा यांनी लिखित माफी मागावी अन्यथा आयएमएच्या प्रत्येक डॉक्टराचा अवमान केला म्हणून प्रती डॉक्टर ५० लाख रु. प्रमाणे १ हजार कोटी रु. नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली आहे.

या नोटीसीत रामदेव बाबा यांनी आपला एक व्हीडिओ प्रसिद्ध करून त्या द्वारे डॉक्टरांच्या विरोधात केलेल्या अवमानजनक टिप्पण्णींबद्दल माफी मागावी, ती सोशल मीडियात प्रसिद्ध करावी अशीही मागणी केली आहे. रामदेव बाबा यांनी कोविड-१९वर काढलेल्या कोरोनील कीटच्या जनतेला फसवणार्या जाहिरातीही मागे घ्याव्यात असे या नोटीस नमूद करण्यात आले आहे.

गेल्या रविवारी रामदेव बाबा यांनी अलोपॅथी उपचारपद्धतीवर टीका करताना तिला ‘स्टुपिड’ (मूर्खपणा) व दिवाळखोर विज्ञान असे संबोधले होते. रामदेव बाबांनी २५ प्रश्नही अलोपॅथीला विचारले होते. रेमडेसिवीर, फॅबीफ्लू व अन्य औषधे घेऊनही कोविड रुग्णांचे मृत्यू अलोपॅथी रोखू शकली नाही, असे आरोप त्यांनी केले होते.

रामदेव बाबांच्या अशा टीकेनंतर केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी या प्रकरणात हस्तक्षेप करत रामदेव बाबांनी आपली अलोपॅथीवरची टिप्पण्णी मागे घ्यावी असे त्यांना सुनावले होते. पण रामदेव बाबांनी ड़ॉक्टरांवर पुन्हा टीका केली होती.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0