मुंबईः फेकन्यूजच्या जमान्यात बातम्यांची सत्यअसत्यता जनतेपुढे मांडणाऱ्या ‘अल्टन्यूज’ या पोर्टलचे सहसंस्थापक मोहम्मद झुबेर यांना सोमवारी दिल्ली पोलिसांच
मुंबईः फेकन्यूजच्या जमान्यात बातम्यांची सत्यअसत्यता जनतेपुढे मांडणाऱ्या ‘अल्टन्यूज’ या पोर्टलचे सहसंस्थापक मोहम्मद झुबेर यांना सोमवारी दिल्ली पोलिसांच्या आयएफएसओ (इंटेलिजन्स फ्युजन अँड स्ट्रॅटेजिक ऑपरेशन) युनिटने ताब्यात घेतले. झुबेर यांच्यावर धार्मिक भावना भडकवल्याचा आरोप असून त्यांच्यावर आयपीसी सेक्शन १५३ अ, २९५ अ अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. महिन्याभरापूर्वी एका व्यक्तीने झुबेर यांच्याविरोधात धार्मिक भावना दुखावल्याची तक्रार नोंद करत त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी दिल्ली पोलिसांकडे केली होती. त्यानुसार झुबेर यांच्याविरोधात काही पुरावे आढळल्यानंतर त्यांना अटक करण्यात आल्याचे आयएफएसओ युनिटचे डीसीपी केपीसी मल्होत्रा यांनी सांगितले.
झुबेर यांच्या अटकेसंदर्भात अल्टन्यूजचे संस्थापक प्रतीक सिन्हा यांनी सांगितले की, झुबेर यांना कोणतीही आगाऊ नोटीस न देता सोमवारी संध्याकाळी पावणे सातच्या सुमारास दिल्ली पोलिसांनी अटक केली. वास्तविक कायद्यानुसार पोलिसांना नोटीस देणे बंधनकारक असते, पण तशी नोटीस न देता व फिर्यादीची प्रत न देता झुबेर यांना अटक करण्यात आल्याचे सिन्हा यांनी सांगितले.
COMMENTS