नवी दिल्लीः हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणातल्या मृत तरुणीचा फोटो भाजपच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी ट्विटर या सोशल मीडियावर पोस्ट केला होता.
नवी दिल्लीः हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणातल्या मृत तरुणीचा फोटो भाजपच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी ट्विटर या सोशल मीडियावर पोस्ट केला होता. एका पोलिस अधिकार्याने या तरुणीवर बलात्कार झाला नसल्याचे विधान केले होते, त्यानंतर लगेचच मालवीय यांनी तरुणीचा फोटो ट्विटरवर प्रसिद्ध केला होता. पण नंतर तो काढून टाकण्यात आला.
आयपीसीनुसार बलात्कार, बलात्काराचा संशय वा लैंगिक छळाचे बळी पडलेल्या पीडितांची ओळख करण्यास सक्त मनाई असून तसे कृत्य केल्यास कायद्यात २ वर्षांची शिक्षा आहे. पण याकडे डोळेझाक करत पोलिस अधिकार्याचा दावा ग्राह्य धरून राजकीय संकटात सापडलेल्या भाजपला मदत म्हणून मालवीय यांनी हे कृत्य केले आहे.
भाजपच्या आयटी सेलने ४८ सेकंदाचा हा व्हीडिओ २ ऑक्टोबरला ट्विट केला. त्या ट्विटमध्ये अलिगड मुस्लिम विद्यापीठाच्या बाहेर एका पत्रकारासोबत चर्चा करत असताना मृत मुलीवर बलात्कार झाला नाही पण तिचा गळा आवळून खून झाल्याची बाब पुढे आली होती. पण याने गुन्ह्याची तीव्रता कमी होत नाही पण एखाद्या घटनेला कोणताही रंग देणे व गुन्ह्याची गंभीरता कमी केली जात असल्याचा, मजकूर होता. याच दिवशी भाजपच्या महिला आघाडीच्या (सोशल मीडिया) राष्ट्रीय प्रभारी प्रीती गांधी यांनीही हा व्हीडिओ ट्विट करत हाथरस घटनेत बलात्कार झालाच नसल्याचे विधान केले होते. अशा कल्पना केवळ ल्युटियन मीडियाकडून पसरवल्या जातात, असाही त्यात आरोप करण्यात आला होता.
प्रीती गांधीचे यांचे हे ट्विट मालवीय यांनी रिट्विट केले होते.
या संदर्भात राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष रेखा शर्मा यांनी इंडियन एक्स्प्रेसला सांगितले की, बलात्कार पीडितेचा व्हीडिओ शेअर करणे हे अत्यंत दुःखद असून ते बेकायदा आहे.
मूळ बातमी
COMMENTS