कलम ३७१ला हात लावणार नाही : अमित शहा

कलम ३७१ला हात लावणार नाही : अमित शहा

गुवाहाटी : ईशान्य भारतातील राज्यांना विशेष दर्जा असलेले राज्यघटनेतील ३७१ कलम रद्द करण्याचा  वा त्यामध्ये दुरुस्त्या करण्याची कोणतीही इच्छा केंद्र सरका

रिजिजूंच्या चकमा-हाजोंग विधानावरून अरुणाचलमध्ये गदारोळ
आसाममध्ये भाजप उमेदवाराच्या गाडीत ईव्हीएम
मेवानी यांचा जामीन मंजूर

गुवाहाटी : ईशान्य भारतातील राज्यांना विशेष दर्जा असलेले राज्यघटनेतील ३७१ कलम रद्द करण्याचा  वा त्यामध्ये दुरुस्त्या करण्याची कोणतीही इच्छा केंद्र सरकारची नाही असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी स्पष्ट केले. ते ईशान्य राज्यांच्या ६८व्या परिषदेत बोलत होते.

जम्मू व काश्मीरला विशेष दर्जा असणारे ३७० कलम रद्द केल्यानंतर आता केंद्राकडून ३७१ कलमही रद्द केले जाऊ शकते असा दुष्प्रचार काही जणांकडून केला जात होता, पण सरकारच्या मनात ३७१ कलमाला हात लावण्याची इच्छा नाही असे शहा यांनी सांगितले.

संसदेतही मी ३७१ कलमाला हात लावणार नसल्याचे म्हटले होते. आता ८ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसमोरही मी हेच विधान पुन्हा करत आहे, असे शहा म्हणाले.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0