मास्क नसल्याने पोलिसांच्या मारहाणीत युवकाचा मृत्यू

मास्क नसल्याने पोलिसांच्या मारहाणीत युवकाचा मृत्यू

गुंटूरः चेहऱ्यावर मास्क लावला नाही म्हणून पोलिसांनी केलेल्या जबर मारहाणीत यारिचारला किरण कुमार या २५ वर्षाच्या तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना प्रकाशम जि

आठवड्यात १५ लाखाहून अधिक कोरोना रुग्ण
राज्यात डेल्टा प्लस विषाणूचे २१ रुग्ण
लॉकडाऊनची धुळवड

गुंटूरः चेहऱ्यावर मास्क लावला नाही म्हणून पोलिसांनी केलेल्या जबर मारहाणीत यारिचारला किरण कुमार या २५ वर्षाच्या तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना प्रकाशम जिल्ह्यात चिराला गावात घडली.

गेल्या रविवारी यारिचारला कुमार आपल्या मित्रासह मोटार सायकलवरून जात असताना त्याला काही पोलिसांनी थांबवले. यामध्ये पोलिसांनी मास्क का लावला नाही याची विचारणा केली. हा विषय चिघळत गेला. एका पोलिसाने आपले वरिष्ठ पोलिस उपनिरीक्षक विजय कुमार यांना घटनास्थळी बोलावले. विजय कुमार यांनी या दोघांना पोलिस ठाण्यात जीपमधून नेले. यावेळी जीपमधून यारिचारला कुमार याने उडी मारून पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यात तो डोक्यावर पडून त्याला गंभीर दुखापत झाली असे पोलिसांचे म्हणणे आहे.

पण कुमारला पोलिसाने इतके बेदम मारले की त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन त्याचा मृत्यू झाला असा आरोप कुमार याच्या कुटुंबियांनी केला. पोलिसांनी हे आरोप फेटाळले असून कुमार रस्त्यावर पडल्यानंतर रस्त्यावर रक्ताचे डाग आढळून आले असून त्याने व त्याच्या मित्राने दारु प्याली होती असे गुंटूरच्या जिल्हा पोलिस प्रमुखांचे म्हणणे आहे. यारिचारला कुमारच्या रक्तात दारुचा अंश आढळून आला असून त्याच्या मित्राचा रक्त तपासणी अहवाल अद्याप आलेला नाही, असे पोलिसांनी सांगितले.

रस्त्यावर पडल्यानंतर जखमी अवस्थेत यारिचारला कुमारला सरकारी रुग्णालयात नेण्यात आले पण चांगले उपचार व्हावेत म्हणून त्याला खासगी रुग्णालयात नेण्यात आले तेथे त्याचा मृत्यू झाला, असेही पोलिसांनी सांगितले.

मुंबई मिररने  दिलेल्या वृत्तात ही घटना १८ जुलैला झाली व तरुणाचा मृत्यू २१ जुलैला झाला, असे म्हटले आहे.

या घटनेत यारिचारला कुमारचा मित्र प्रमुख साक्षीदार असून त्याने अद्याप कोणताही जबाब दिलेला नाही. पोलिसांनी यासंदर्भात गुन्हा दाखल केला असून स्वतंत्र चौकशी केली जाईल असे सांगितले आहे.

तर मुख्यमंत्री वाय एस जगनमोहन रेड्डी यांनी यारिचारला याच्या कुटुंबियांना १० लाख रु.चे आर्थिक साह्य केले आहे.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0