‘भारतातील कोरोना विषाणूचा प्रकार जगाला धोकादायक’

‘भारतातील कोरोना विषाणूचा प्रकार जगाला धोकादायक’

बंगळुरूः भारतातील कोरोना रुग्णांच्या संख्येत मंगळवारीही घट दिसली नाही. कोरोना रुग्णांचा हा वाढता आलेख गेले सात दिवस कायम असून आंतरराष्ट्रीय आरोग्य संघ

राज्याच्या रेमडेसिवीर पुरवठ्यात वाढ
५ लाख आयसीयू बेड, दीड लाख डॉक्टर, २ लाख नर्सची गरज
आयआयटी मद्रासमध्ये १०० विद्यार्थ्यांना कोरोना

बंगळुरूः भारतातील कोरोना रुग्णांच्या संख्येत मंगळवारीही घट दिसली नाही. कोरोना रुग्णांचा हा वाढता आलेख गेले सात दिवस कायम असून आंतरराष्ट्रीय आरोग्य संघटनेने भारतातील कोरोना विषाणूच्या प्रकारामुळे जगाला धोका पोहचू शकतो असा इशारा दिला आहे.

मंगळवारी देशात ३ लाख २९ हजार ९४२ नव्या कोरोना रुग्णांची भर पडली असून ३ हजार ८७६ रुग्ण कोरोनाने मरण पावले असल्याची माहिती आरोग्य खात्याने दिली. भारतात आजपर्यंत कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या २ कोटी २९ लाखाच्या वर गेली असून मृत्यूची आकडेवारी २ लाख ४९ हजार ९९२ इतकी झाली आहे.

भारतातील कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण जगाच्या तुलनेत वाढले असून कोरोनाने मरण पावणार्या जगातील प्रत्येकी तीन रुग्णांमध्ये एक रुग्ण भारतातील असल्याचे रॉयटर्सचे म्हणणे आहे.

या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय आरोग्य संघटनेने भारतातील कोरोना विषाणूचा प्रकार जगाच्या दृष्टीने घातक असून या विषाणूचा प्रसार वेगाने होत असल्याची भीती आंतरराष्ट्रीय आरोग्य संघटनेच्या कोविड-१९ तांत्रिक प्रमुख मरिया व्हॅन केरखोव्हे यांनी जिनीव्हा येथे व्यक्त केली आहे. भारतातील कोरोना विषाणूचा प्रसार वेगाने होत असल्याचे काही पुरावे मिळत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

दरम्यान भारतातील ऑक्सिजन टंचाईवर जगभरातून मदतीचा ओघ येत असला तरी देशातील अनेक शहरांतील रुग्णांलयांमध्ये ऑक्सिजनची टंचाई मात्र कमी झालेली दिसत नाही. सोमवारी तिरुपती येथील सरकारी रुग्णालयात ऑक्सिजन अभावी ११ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला. या रुग्णांपर्यंत ऑक्सिजन पोहोचलाच नाही अशी माहिती सरकारी सूत्रांकडून देण्यात आली.

तर अलिगड मुस्लिम विद्यापीठातील १६ फॅकल्टी मेंबर, एक निवृत्त प्राध्यापक व एका कर्मचार्याचा कोरोनाने मृत्यू झाल्याचे सूत्रांनी सांगितले. हे सर्व विद्यापीठात राहात होते.

गायीच्या शेणाचा वापर करू नका

कोविड बाधित रुग्ण गायीचे शेणाचे सेवन केल्याने बरे होतात याला कोणताही वैद्यकीय पुरावा नसून रुग्णांवर तसे उपचार करू नये, असे आवाहन देशातील सर्व डॉक्टर समुदायाने केले आहे. गुजरातमध्ये एका गोशाळेत कोविड सेंटर उभे करून तेथील रुग्णांवर गायीचे मूत्र व शेण देऊन उपचार केले जात असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते, त्यानंतर वैद्यकीय क्षेत्रातून या विषयी तीव्र नाराजी प्रकट झाली होती. गोमूत्र व शेण हे कोरोनावर गुणकारी उपचार असल्याचे कोणतेही वैद्यकीय संशोधन झालेले नाही. हे समज पूर्णपणे अवैज्ञानिक व अंधश्रद्धेचे असल्याचे इंडियन मेडिकल असो.चे म्हणणे आहे.

दुसर्या लाटेचे औद्योगिक क्षेत्रावरही परिणाम

कोरोनाच्या दुसर्या लाटेने देशातील अनेक राज्यांमध्ये लॉकडाऊन लागू झाल्याने त्याचा परिणाम औद्योगिक क्षेत्रांवर पडू लागला आहे. कारखानदारी सुरू असली तरी कामावर येणारे श्रमिक कोरोना बाधित होण्याच्या घटना वाढीस लागल्या आहेत. मंगळवारी तामिळनाडूतील ऍपल-१२ मोबाइल फोन निर्मिती करणार्या फॉक्सकॉन कारखान्यातले ५० टक्क्याहून अधिक श्रमिकांना कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त आहे. त्यामुळे कारखान्याचे उत्पादन ५० टक्क्याहून कमी होईल अशी भीती व्यक्त केली जात आहे.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0