पिगॅसस हेरगिरी : अॅपलकडून एनएसओवर खटला

पिगॅसस हेरगिरी : अॅपलकडून एनएसओवर खटला

नवी दिल्लीः एनएसओ या इस्रायलच्या कंपनीने आपल्या ग्राहकांच्या मोबाइल फोनमध्ये शिरून त्यांची माहिती चोरल्याचा आरोप करत जगातील बलाढ्य कंपनी अॅपलने एनएसओ

लडाखमध्ये अराजपत्रित पदे स्थानिकांसाठी राखीव
सुवर्ण पदक विजेत्या मुलीने सरन्यायाधीशांच्या हस्ते पदक घेणे नाकारले
लक्षद्वीपमध्ये शाळांची सुटी रविवारी केल्याने संताप

नवी दिल्लीः एनएसओ या इस्रायलच्या कंपनीने आपल्या ग्राहकांच्या मोबाइल फोनमध्ये शिरून त्यांची माहिती चोरल्याचा आरोप करत जगातील बलाढ्य कंपनी अॅपलने एनएसओ व त्यांच्या मूळ कंपनीवर अमेरिकेत खटला दाखल केला आहे. काही महिन्यांपूर्वी अमेरिकेने एनएसओ या कंपनीला काळ्या यादीत टाकले होते. त्यानंतर अॅपलने हे महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.

आमच्या ग्राहकांच्या खासगी जीवनात घुसखोरी करून त्यांची व्यक्तिगत स्वरुपाची माहिती मिळवण्याने आमचे नुकसान झाले आहे. हे नुकसान रोखण्यासाठी एनएसओने पावले उचलली पाहिजेत. एनएसओने अॅपलची सॉफ्टवेअर, त्यांच्या सेवा व वस्तू यांचा उपयोग करू नये, असे अॅपलने म्हटले आहे.

एनएसओने पिगॅसिस या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून जगातील १० देशांतील महत्त्वाचे राजकीय नेते, विविध क्षेत्रातील मान्यवर, न्यायाधीश, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते यांच्यावर पाळत ठेवली होती. हे सॉफ्टवेअर एनएसओने अनेक देशांच्या सरकारला विकले होते. त्यामुळे सरकारला हेरगिरी करणे, माहिती मिळवणे सोपे गेले होते. या हेरगिरी प्रकरणात पिगॅसिसने अॅपल मोबाइलमध्ये शिरकाव करून माहितीची चोरी केली होती. या माहितीच्या चोरीचा व हेरगिरीचा खुलासा द वायर सहित १७ आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थांनी उघडकीस आणला होता. पिगॅसस हेरगिरी प्रकरणाचे अनेक फोरेन्सिक पुरावे हाती लागले होते. युनिव्हर्सिटी ऑफ टोरंटोच्या सिटीझन लॅब व एम्नेस्टी इंटरनॅशनलच्या सिक्युरिटी लॅबने या पुराव्यांची पुष्टीही केली होती.  त्यामुळे जगभर खळबळ माजली होती.

पिगॅसिस हेरगिरीमध्ये जगभरातील ५० हजार ग्राहकांचे मोबाइल क्रमांक आढळून आले होते. या मोबाइल क्रमांकवर हेरगिरी, पाळत ठेवली जात होती वा हेरगिरी व पाळत ठेवण्यासाठी हे क्रमांक निश्चित करण्यात आले होते, अशी माहिती मिळाली होती. भारतात ३००हून अधिक जणांचे मोबाइल क्रमांक निश्चित करण्यात आले होते.

दरम्यान मंगळवारी आपल्या प्रसिद्धी पत्रकात अॅपलने पिगॅसिस हेरगिरी प्रकरण उघडकीस आणणार्या द वायरसह अन्य या आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थांचे कौतुक केले तसेच त्यांनी सिटीजन लॅब व एम्नेस्टीच्या प्रयत्नांची प्रशंसा करत भविष्यात अॅपलची सायबर सर्विलान्स रिसर्च अशा संघटनांना आर्थिक मदत करण्यास तयार असल्याची घोषणा केली.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0