राफेल व्यवहाराची पुन्हा चौकशी व्हावीः काँग्रेस

राफेल व्यवहाराची पुन्हा चौकशी व्हावीः काँग्रेस

नवी दिल्लीः भारताला विक्री केलेल्या सुमारे ७.८ अब्ज युरो किंमतीच्या ३६ राफेल विमानांच्या खरेदी प्रकरणाची चौकशी करण्याचा निर्णय फ्रान्स सरकारने घेतल्या

संसदीय समितीमार्फत फेसबुकची चौकशी व्हावीः काँग्रेस
महाजनादेशाचा अन्वयार्थ
काँग्रेस-पायलट गटांत तोडगा

नवी दिल्लीः भारताला विक्री केलेल्या सुमारे ७.८ अब्ज युरो किंमतीच्या ३६ राफेल विमानांच्या खरेदी प्रकरणाची चौकशी करण्याचा निर्णय फ्रान्स सरकारने घेतल्याने देशातील विरोधी पक्षांनीही राफेल खरेदी घोटाळ्याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी केली आहे. काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा राफेल घोटाळ्यावरून लक्ष्य केले आहे.

शुक्रवारी फ्रान्स सरकारने राफेल विक्री संदर्भात न्यायालयीन चौकशी करण्याचा निर्णय घेतल्याचे वृत्त शुक्रवारी फ्रेंच वेबसाइट मीडियापार्टने दिल्यानंतर देशातील राजकारणात भाजपवर टीका सुरू झाली.

राफेल खरेदीची चौकशी व्हावी अशी याचिका ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांनी सर्वोच्च न्यायालयात पूर्वी दाखल केली होती. पण ही याचिका तत्कालिन सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी फेटाळली होती. आता मीडियापारच्या वृत्तानंतर प्रशांत भूषण यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी हे वृत्त आम्ही ज्या चौकशीची मागणी करत होतो, त्याला पुष्टी देत असल्याचे सांगितले. आम्हाला दोन वर्षांपूर्वी राफेल घोटाळ्याची स्वतंत्र चौकशी हवी होती पण दुर्दैवाने तत्कालिन सरन्यायाधीश गोगाई यांनी सरकारने पाठवलेल्या बंद लिफाफ्यावर विश्वास ठेवला. त्यानंतर अस्तित्वात नसलेला कॅग रिपोर्टवर विश्वास ठेवला गेला. पुढे सरन्यायाधीश गोगोई यांना निवृत्तीनंतर राज्यसभा खासदारकी मिळाली. आपल्या मीडियाचे दुर्दैव असे की राफेल घोटाळ्याचे खोलात जाऊन त्यांनी वृत्तांकन केले नाही. आता फ्रान्समधील मीडिया राफेल व्यवहारातील भ्रष्टाचार, लाचलुचपत, आर्थिक गैरव्यवहार व वशीलेबाजीवर बोट ठेवत आहे व त्याची चौकशी तेथील न्यायालय करणार आहे, अशी प्रतिक्रिया दिली.

काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी काँग्रेस पक्ष व पक्षाचे माजी अध्यक्ष राहुल गांधी पहिल्यापासून राफेल लढाऊ विमान खरेदीमध्ये घोटाळा झाल्याचे सांगत आहेत. आता फ्रान्सचा मीडिया जे काही सांगत आहे त्या सत्यावर शिक्कामोर्तब झाल्याची प्रतिक्रिया दिली. आता घोटाळा, भ्रष्टाचार पुढे आलेला आहे, पंतप्रधान मोदी या घोटाळ्याची चौकशी करतील का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

हा प्रश्न आता भाजप विरुद्ध काँग्रेस असा राहिलेला नसून तो देशाच्या संरक्षणाचा झाला आहे. सरकारने संसदीय समिती स्थापन करून राफेल व्यवहाराची चौकशी केली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. हा मुद्दा संसदेच्या अधिवेशनात उपस्थित करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

भाजपने या आरोपावर उत्तर देताना काँग्रेस अफवा पसरवत असल्याचे सांगितले. एका एनजीओच्या तक्रारीवरून राफेल कराराची चौकशी होत असेल याचा अर्थ भ्रष्टाचार सिद्ध होत नाही, असे उत्तर भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी दिले. ही चौकशी कॉर्पोरेट कंपन्यांमधील व्यापार युद्ध असल्याचाही दावा पात्रा यांनी केला. राहुल गांधी दासॉल्ट कंपनीच्या विरोधकांचे बाहुले बनत असल्याचाही आरोप पात्रा यांनी केला.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0