पुष्कर सिंग धामी उत्तराखंडचे नवे मुख्यमंत्री

पुष्कर सिंग धामी उत्तराखंडचे नवे मुख्यमंत्री

नवी दिल्लीः  भाजपने उत्तराखंडच्या मुख्यमंत्रीपदासाठी पुष्कर सिंग धामी यांच्या नावावर शनिवारी शिक्कामोर्तब केले. राज्याचे ते ११ वे मुख्यमंत्री असतील. ध

तीर्थसिंग रावत उत्तराखंडचे नवे मुख्यमंत्री
‘सांगली पूरग्रस्तांना पॅकेज नाही पण सर्व मदत मिळेल’
उत्तराखंडचे मुख्यमंत्री रावत यांचा राजीनामा

नवी दिल्लीः  भाजपने उत्तराखंडच्या मुख्यमंत्रीपदासाठी पुष्कर सिंग धामी यांच्या नावावर शनिवारी शिक्कामोर्तब केले. राज्याचे ते ११ वे मुख्यमंत्री असतील. धामी हे उधम सिंग नगर जिल्ह्यातील खातीमा या मतदारसंघातून दोन वेळा आमदार म्हणून निवडून आले असून ते महाराष्ट्राचे राज्यपाल कोश्यारी व संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या अत्यंत निकटचे समजले जातात.

धामी हे गेल्या चार महिन्यातले भाजपचे तिसरे मुख्यमंत्री आहेत. भाजपचे विधानसभेत संख्याबळ ५७ असून पक्षातील अंतर्गत संघर्ष व कोरोना महासाथ हाताळण्यात आलेले अपयश यामुळे केंद्रीय नेतृत्व राज्य भाजपातील नेत्यांवर नाराज झालेले आहे.

दरम्यान उत्तराखंडमधील राजकीय नाट्यावर भाष्य करताना काँग्रेसचे नेते व माजी मुख्यमंत्री हरिश रावत यांनी तीरथ सिंग रावत यांचा राजीनामा घटनात्मक पेचामुळे वा कोविड परिस्थिती हाताळता न आल्यामुळे घेतलेला नसल्याचा दावा केला आहे. कोरोना महासाथीच्या काळात उत्तराखंडमध्ये साल्ट या मतदारसंघात निवडणूक आयोगाने पोट निवडणूक घेतली होती. निवडणूक आयोग निवडणुका घेऊ शकते पण भाजपचे नेते जनतेमध्ये गैरसमज पसरवत असल्याची टीका त्यांनी केली.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0