पाकिस्तानकडून साखर, कापसावरची आयातबंदी मागे

पाकिस्तानकडून साखर, कापसावरची आयातबंदी मागे

नवी दिल्लीः पाकिस्तान सरकारने बुधवारी भारताच्या साखर व कापसावरची आयात बंदी मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री मेहमूद कुरेशी य

पत्रकारितेसाठी भारत धोकादायक
शेतकरी संघटनांशी चर्चेस तयारः कृषीमंत्री
गांधी कुटुंबांशी संबंधित ट्रस्टच्या चौकशीसाठी समिती

नवी दिल्लीः पाकिस्तान सरकारने बुधवारी भारताच्या साखर व कापसावरची आयात बंदी मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री मेहमूद कुरेशी यांनी ही माहिती देताना उभय देशांमधील संबंध पूर्ववत होतील, अशी आशा व्यक्त केली आहे.

2019मध्ये जम्मू व काश्मीरला विशेष दर्जा देणारे 370 कलम भारतीय संसदेने रद्द केल्यानंतर भारत-पाकिस्तानमधील व्यापार थांबला होता. त्यानंतर गेले दोन वर्षे हा तणाव कायम राहिला होता. हा तणाव कमी व्हावा म्हणून उभय देशांनी प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर शस्त्रसंधीची घोषणा केली होती. त्यानंतर भारताच्या पंतप्रधानांनी पाकिस्तानच्या पंतप्रधानांना पाकिस्तान दिवसाच्या शुभेच्छा देणारा संदेश पाठवला होता. तर ताजिकीस्तान येथे हार्ट ऑफ एशिया परिषदेत भारत व पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांनी एकमेकांविरोधात कोणतीही विधाने केली नव्हती. त्या पार्श्वभूमीवर उभय देशांमधील व्यापार पुन्हा सुरू व्हावा म्हणून प्रयत्न सुरू झाले होते.

पाकिस्तानमधील प्रमुख वर्तमानपत्र डॉनने म्हटलेय की, पाकिस्तानातील खासगी व्यापार्यांना भारताकडून 5 लाख टन साखर आयात करण्याची परवानगी देण्यात आली आहे. ही घोषणा पाकिस्तानचे अर्थमंत्री हमाद अझहर यांनी केली आहे. त्याच बरोबर येत्या जूनपासून भारतातील कापूस पाकिस्तानाने आयात करण्याचे ठरवले आहे. पाकिस्तानच्या कापड उद्योगाला कापसाची टंचाई भासत असून त्यातून हा निर्णय घेण्यात आला आहे.

गेल्या वर्षी कोविड-19 चे संकट पाहून पाकिस्तानने भारतातील औषधांवर घातलेली आयात बंदी मागे घेतली होती.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0