बंडखोर आमदारांची किंमत अनलिमिटेड : गेहलोत

बंडखोर आमदारांची किंमत अनलिमिटेड : गेहलोत

जयपूरः १४ ऑगस्टनंतर विधानसभा सत्र बोलावण्यास राजस्थानच्या राज्यपालांनी संमती दिल्यानंतर काँग्रेसच्या बंडखोर आमदारांचा घोडेबाजार मोठ्या प्रमाणात वाढला

सर्वोच्च न्यायालयाकडून पायलट गटाला दिलासा
काँग्रेस-पायलट गटांत तोडगा
रणभूमीतील ‘पायलट’चे भरकटलेले उड्डाण

जयपूरः १४ ऑगस्टनंतर विधानसभा सत्र बोलावण्यास राजस्थानच्या राज्यपालांनी संमती दिल्यानंतर काँग्रेसच्या बंडखोर आमदारांचा घोडेबाजार मोठ्या प्रमाणात वाढला असून यापूर्वी पहिला हप्ता १० कोटी रु. तर दुसरा १५ कोटी रु. होता तो आता अलिमिटेड झाल्याचा आरोप राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी केला आहे.

गेहलोत यांनी सरकारच्या विरोधात व्हीप काढण्याच्या बसपाच्या अध्यक्ष मायावती यांच्या निर्णयावरही टीका केली. मायावती यांच्या निर्णयामागे भाजप असून या दोघांना काँग्रेस सरकार पाडायचे आहे, असे ते म्हणाले.

जेव्हा राज्यसभेत तेलुगू देसमचे ४ खासदार भाजपला मिळाले तर ते योग्य ठरते पण राजस्थानात काँग्रेसमध्ये आलेले बसपाचे ६ आमदार हे चुकीचे ठरतात, याकडे गेहलोत यांनी लक्ष वेधले. मायावती सरकारविरोधात जी काही विधाने करत आहे, ती भाजपच्यावतीने आहेत. भाजप विरोधकांना नेस्तनाबूत करण्यासाठी ज्या प्रकारे ईडी-सीबीआय वापरत आहेत, त्याचा दबाव मायावतींवर असल्याने त्या भाजपची बाजू घेत असल्याचे गेहलोत म्हणाले. राजस्थानात काय चालले आहे, हे सर्वांना लक्षात आले असेल असेही ते म्हणाले.

दरम्यान शुक्रवारी काँग्रेसच्या आमदारांना चार्टर विमानातून  जैसलमेरमध्ये आणण्यात आले आहे. हे सर्व आमदार १४ ऑगस्टपर्यंत येथेच राहणार आहेत. राजस्थान विधानसभेचे कामकाज १४ ऑगस्टनंतर सुरू करावे असे राज्यपालांनी सांगितले आहे. शुक्रवारी काँग्रेसच्या बंडखोर आमदारांनी पक्षात परत यावे, असे आवाहनही गेहलोत यांनी केले.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0