मेहबुबांची ३ महिन्यांनी नजरकैद वाढवली

मेहबुबांची ३ महिन्यांनी नजरकैद वाढवली

श्रीनगरः जम्मू व काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री व पीडीपीच्या अध्यक्ष मेहबुबा मुफ्ती यांची नजरकैद ३ महिन्यांनी वाढवली आहे. जम्मू व काश्मीरला विशेष दर्जा

एनसीईआरटीने काश्मीरातील चळवळीचा इतिहास वगळला
काश्मीरमध्ये न्यायव्यवस्था विस्कळित
२३ व्या दिवशीही काश्मीरमधील जनजीवन विस्कळीतच

श्रीनगरः जम्मू व काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री व पीडीपीच्या अध्यक्ष मेहबुबा मुफ्ती यांची नजरकैद ३ महिन्यांनी वाढवली आहे. जम्मू व काश्मीरला विशेष दर्जा देणारे ३७० कलम गेल्या वर्षी ५ ऑगस्टला रद्द केल्यानंतर त्या अटकेत व नजरकैदेत आहेत. शुक्रवारी त्यांची ही नजरकैद ५ नोव्हेंबरपर्यंत वाढवण्याचा निर्णय सरकारने घेतला.

मेहबुबा यांच्यावर सार्वजनिक सुरक्षा कायद्यांतर्गत कारवाई केली गेली आहे. त्यांनी आपल्या बेकायदा नजरबंदीविरोधात सर्वोच्च न्यायालयात २६ फेब्रुवारीला याचिका दाखल केली आहे पण त्याची अद्याप सुनावणी सुरू झालेली नाही.

शुक्रवारी ३ महिन्यांनी नजरकैद वाढल्यानंतर एक ट्विट करून मेहबुबा यांनी आपली नजरकैद वाढल्याचे स्पष्ट करत सर्वोच्च न्यायालयही आपली याचिका सुनावणीस घेत नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. आता न्याय कोणाकडे मागणार असा सवाल त्यांनी केला आहे. मेहबुबा यांचे ट्विटर अकाउंट त्यांची मुलगी इल्जिता मुफ्ती यांच्याकडून चालवले जात आहेत.

मेहबुबा यांना पूर्वी सरकारी गेस्ट हाऊसमध्ये नजरकैदेत ठेवण्यात आले होते. नंतर त्यांना त्यांच्या घरीच नजरकैदेत ठेवण्यात आले आहे.

दरम्यान शुक्रवारी पीपल्स कॉन्फरन्स पार्टीचे अध्यक्ष सज्जाद लोन यांची नजरकैदेतून एक वर्षाने सुटका करण्यात आली. आपल्यासाठी तुरुंगवास नवा अनुभव नव्हता पण एक वर्षांची नजरकैद मानसिकदृष्ट्या थकवा आणणारी होती, अशी प्रतिक्रिया लोन यांनी ट्विटरवरून दिली.

लोन यांना पूर्वी एमएलए हॉस्टेलमध्ये नजरकैदेत ठेवले होते पण नंतर त्यांना पीडीपीचे युवक अध्यक्ष वहीद पारा यांच्यासोबत त्यांच्या सरकारी घरात नजरकैदेत ठेवण्यात आले होते.

काश्मीरमधील दोन मुख्य नेते ओमर व फारुक अब्दुल्ला यांना मार्च महिन्यात सोडण्यात आले होते.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0