पत्रकाराला गायब करण्याची भाजप नेत्याकडून धमकी

पत्रकाराला गायब करण्याची भाजप नेत्याकडून धमकी

गुवाहाटी-मोरीगांवः आसाम सरकारमधील आरोग्य व कुटुंब कल्याणमंत्री पीयूष हजारिका यांनी दोन पत्रकारांनी केलेल्या वृत्तांकनावर आक्षेप घेत दोघांना गायब करेन

एनआरसीवरून सर्व पक्ष असमाधानी
‘लाल सलाम’, ‘कॉम्रेड’ म्हटल्यास गुन्हा
नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावर ईशान्य भारत अस्वस्थच

गुवाहाटी-मोरीगांवः आसाम सरकारमधील आरोग्य व कुटुंब कल्याणमंत्री पीयूष हजारिका यांनी दोन पत्रकारांनी केलेल्या वृत्तांकनावर आक्षेप घेत दोघांना गायब करेन अशी धमकी दिली आहे.

हजारिका यांच्या पत्नीचे एमी बरुआ यांचे एक वादग्रस्त भाषण प्रतिदिन टाइम्स या वृत्तवाहिनीने प्रसारित केले होते. या भाषणात जे नागरिक सीएएला विरोध करतील त्यांना केवळ आसाममधून नव्हे तर या देशातून हाकलून दिले जाईल, अशी धमकी एमी बरुआ यांनी दिली होती. या वृत्तामुळे खळबळ माजल्यानंतर बरुआ यांनी माझ्या विधानाचे वेगळा अर्थ लावल्याचा बचाव केला होता व ज्यांच्या माझ्या विधानाने भावना दुखावल्या असतील त्यांची मी माफी मागते असेही त्या म्हणाल्या होत्या.

या भाषणा संदर्भात पीयूष हजारिका यांचे प्रतिदिन टाइम्सचे पत्रकार नजरूल इस्लाम यांच्याशी फोनवरून संभाषण झाले होते. हे संभाषण प्रसिद्ध झाले.

या संभाषणात पीयूष हजारिका पत्रकार नजरूल इस्लाम व अन्य एक पत्रकार तुलसी या दोघांना घरातून बाहेर फरपटत नेऊन गायब करेन अशी धमकी देताना बोलत आहेत. माझ्या पत्नीच्या भाषणाचा विपर्यस्त अर्थ काढून ते प्रसिद्ध केल्याबद्दल आपल्याला खूप त्रास झाला असेही हजारिका या संभाषणात इस्लाम यांना सांगताना दिसतात.

या ऑडिओ क्लिपमुळे खळबळ माजली. काँग्रेसने पीयूष हजारिका यांची उमेदवारीच रद्द करावी अशी मागणी निवडणूक आयोगाला केली आहे. धमक्या देऊन हजारिका यांनी आचारसंहितेचा भंग केला आहे, त्यांच्यावर फिर्याद दाखल करावी अशीही काँग्रसने मागणी केली आहे.

तर एका पत्रकाराने मोरीगाव जिल्ह्यात जगीरोड पोलिस ठाण्यात हजारिका यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. पण पोलिसांनी ती फिर्याद म्हणून अद्याप नोंद केलेली नाही.

दरम्यान गुवाहाटी प्रेस क्लबने पत्रक जाहीर करून एका पत्रकाराला लोकप्रतिनिधीने गायब करण्याची धमकी देणे अशोभनीय असल्याचे म्हटले आहे.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0