आसाममध्ये भाजप उमेदवाराच्या गाडीत ईव्हीएम

आसाममध्ये भाजप उमेदवाराच्या गाडीत ईव्हीएम

नवी दिल्ली-करीमगंजः आसाममधील करीमगंज जिल्ह्यातील पथरकांडी येथील भाजपचे उमेदवार कृष्णेंदु पॉल यांच्या कारमध्ये इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन (ईव्हीएम) साप

आसाममध्ये जमावाकडून डॉक्टरची हत्या, २१ अटकेत
आसामात वधुवराला धर्म, उत्पन्न घोषित करण्याची सक्ती?
आसाममधील एनआरसी डेटा गायब

नवी दिल्ली-करीमगंजः आसाममधील करीमगंज जिल्ह्यातील पथरकांडी येथील भाजपचे उमेदवार कृष्णेंदु पॉल यांच्या कारमध्ये इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन (ईव्हीएम) सापडल्याने खळबळ उडाली आहे. पॉल यांच्या कारमध्ये ईव्हीएम आढळल्याचा व्हीडिओ सोशल मीडियात व्हायरल झाल्यानंतर निवडणूक आयोगाने शुक्रवारी रात्री राताबारी जागेवरील एका मतदान केंद्रांवर पुन्हा मतदान घेण्याचे आदेश दिले. आयोगाने या संदर्भात ईव्हीएमची जबाबदारी असलेल्या 4 अधिकार्यांना निलंबित केले आहे.

कारमध्ये ईव्हीएम असलेला व्हीडिओ गुरुवारी मतदानाचा दुसरा टप्पा झाल्यानंतर सोशल मीडियात आला. हा व्हीडिओ आसाममधील एक पत्रकार अतनु भुयां यांनी ट्विट केला. त्यांनी पथरकांडी येथील परिस्थिती तणावपूर्ण असल्याचेही ट्विटमध्ये म्हटले होते.

निवडणूक आयोगाने तातडीने या घटनेची चौकशी करून पीठासीन अधिकार्याला परिवहन आचारसंहितेचा भंग केल्याची नोटीस जारी केली व नंतर मतदान केंद्रावरील अधिकारी व अन्य तिघांना रात्री निलंबित केले. या ईव्हीएमचे सील तोडण्यात आले नव्हते.

मतदान केंद्रावरील अधिकार्यांचे अजब उत्तर

गुरुवारी राताबारी विधानसभा क्षेत्रातील इंदिरा एमवी शाळेत मतदान झाल्यानंतर येथील ईव्हीएम मशीन निवडणूक अधिकारी नेत असताना त्यांची गाडी खराब झाली. त्यामुळे त्यांनी एका खासगी वाहनातून हे ईव्हीएम नेण्याचा निर्णय घेतला. योगायोगाने हे खासगी वाहन भाजपचे पथरकांडीतील आमदार कृष्णेंदू पॉल यांच्या नावावर नोंद करण्यात आलेले दिसून आले. ही कार निमल बाजारपेठेत पोहचल्याचे काही जणांनी पाहिले होते. यात एआययूडीएफ व काँग्रेसचे कार्यकर्ते होते. त्यांनी कार थांबवून तोडफोड केली. त्या दरम्यान मतदान केंद्रातील अधिकार्यांनी ईव्हीएम तसेच गाडीत ठेवून पलायन केले.

परिस्थिती तणावपूर्ण झाल्याचे लक्षात आल्यानंतर पोलिस घटनास्थळी पोहचले. त्यांनी पक्ष कार्यकर्त्यांना हटवण्याचा प्रयत्न केला. पण जमाव ऐकत नसल्याचे पाहून पोलिसांनी हवेत गोळीबार केला. नंतर पोलिसांनी हे ईव्हीएम पथरकांडी पोलिस ठाण्यात नेले व दुसर्या दिवशी ते करीमगंज येथील स्ट्राँग रुममध्ये ठेवण्यात आले.

राताबारी येथून स्वतः पॉल हे या भाजपचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहेत.

काँग्रेस आक्रमक

भाजप उमेदवाराच्या कारमध्ये ईव्हीएम सापडल्याने काँग्रेसने भाजप व निवडणूक आयोगावर चौफेर हल्ला चढवला आहे. काँग्रेसच्या उ. प्रदेश महासचिव प्रियंका गांधी यांनी निवडणूक आयोगाने या संदर्भात कडक पावले उचलायला हवीत व ईव्हीएम वापरण्याच्या निर्णयावर पुन्हा सर्व राजकीय पक्षांनी गंभीरपणे विचार करावा अशी विनंती केली आहे.

दरम्यान आसाममध्ये गुरुवारी दुसर्या टप्प्यात 73.03 टक्के मतदान झाले आहे. हे मतदान 39 जागांसाठी झाले आहे.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0