काँग्रेस जाहीरनामा : कर्जमाफी, अनु.जाती-जमातींना मोफत शिक्षणाचे आश्वासन

काँग्रेस जाहीरनामा : कर्जमाफी, अनु.जाती-जमातींना मोफत शिक्षणाचे आश्वासन

नवी दिल्लीः सत्तेवर आल्यानंतर १० दिवसांत शेतकऱ्यांना कर्जमाफी, २ लाख रिक्तपदी शिक्षक भरती, विणकर-कारागीर वा माजी सैनिकांसाठी विधान परिषदेत एक आरक्षित

गोव्यात भाजपकडून ‘काँग्रेस तोडो’ची खेळी
जनतेशी थेट संवाद हवा – सोनिया गांधी
काँग्रेसच्या ७ लोकसभा सदस्यांचे निलंबन

नवी दिल्लीः सत्तेवर आल्यानंतर १० दिवसांत शेतकऱ्यांना कर्जमाफी, २ लाख रिक्तपदी शिक्षक भरती, विणकर-कारागीर वा माजी सैनिकांसाठी विधान परिषदेत एक आरक्षित जागा, महिला पोलिसांना त्यांच्या राहत्या गावात, शहरात पोस्टिंग, पत्रकारांवर लावलेले खोटे गुन्हे रद्द करण्यात येतील अशा अनेक आश्वासनांचा जाहीरनामा काँग्रेसने बुधवारी प्रसिद्ध केला. ‘उन्नति विधान’ जाहीरनामा अशा नावाच्या या जाहीरनाम्यात काँग्रेसने पूर्वी जाहीर केलेल्या पुरुष व महिला बेरोजगारांसाठीचा भर्ती विधान घोषणा पत्र व शक्ती विधान घोषणा पत्राचाही उल्लेख केला आहे.

काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांच्या उपस्थितीत हा जाहीरनामा प्रसिद्ध झाला. यावेळी प्रियंका गांधी म्हणाल्या, राज्यापुढे बेरोजगारी व महागाई असे दोन महत्त्वाचे प्रश्न आहेत. त्या प्रश्नांना केंद्रीत धरून काँग्रेसचा जाहीरनामा असून अनु. जाती, जमाती व अन्य मागास वर्गातील मुला-मुलींना बालवाडी ते पदवीपर्यंत मोफत शिक्षण देण्यात येईल, मागास जातींच्या आरक्षणात उपवर्ग केले जातील. निषाद समुदायाला नदीच्या निगडीत संसाधनांचा अधिकार दिला जाईल, कोल समाजाला अनु. जातीचा दर्जा दिला जाईल, राज्याच्या आरोग्य बजेटमध्ये पाच टक्क्यांची वाढ करण्यात येईल, कोविड महासाथीत मरण पावलेल्या कोरोना योद्धांच्या प्रत्येक कुटुंबाला ५० लाख रु. दिले जाणार आहेत.

काँग्रेसच्या जाहीरनाम्यात शहर विकास, झोपडपट्टीविकासासंदर्भातील काही योजनांचा उल्लेख आहे. त्याच बरोबर मध्यम वर्गालाही घरासाठी अल्प किंमतीत जमीन व आर्थिक मदतीचा उल्लेख आहे. त्याच बरोबर ग्रामसचिवाच्या वेतनात ६ हजार रु. नी व पोलिस पाटलाच्या वेतनात ५ हजार रु.ची वाढ करण्यात येईल असे आश्वासन आहे.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: