छत्तीसगडमध्ये मुख्यमंत्री बदलाला तूर्त विराम

छत्तीसगडमध्ये मुख्यमंत्री बदलाला तूर्त विराम

नवी दिल्लीः काँग्रेसचे छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल व राज्याचे आरोग्यमंत्री टी.एस. सिंहदेव या दोघांसोबत बुधवारी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी च

मणिपूरमध्ये भाजपचे सरकार अल्पमतात
संसदीय समितीमार्फत फेसबुकची चौकशी व्हावीः काँग्रेस
काँग्रेसला झटका; जितीन प्रसाद भाजपमध्ये

नवी दिल्लीः काँग्रेसचे छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल व राज्याचे आरोग्यमंत्री टी.एस. सिंहदेव या दोघांसोबत बुधवारी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी चर्चा केल्यानंतर राज्यातील मुख्यमंत्री बदलाची शक्यता मावळली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ही बैठक सुमारे ३ तास चालली, त्यानंतर काँग्रेस श्रेष्ठींकडून मुख्यमंत्री बदलाचे संकेत नाकारले गेले.

काँग्रेसचे प्रभारी पी.एल. पुनिया यांनी मात्र या बैठकीत राज्यातल्या नेतृत्वबदलाबाबत कोणतीही चर्चा झाली नसल्याचे स्पष्ट करत छत्तीसगडच्या विकास कामांसाठी ही बैठक झाल्याचे सांगितले. पण सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बघेल व सिंहदेव यांच्यातील पेटलेला वाद निवळावा म्हणून राहुल गांधी यांनी अखेर त्यामध्ये समझौता करण्यासाठी बैठक बोलावली. राहुल गांधी यांनी बघेल व सिंहदेव या दोघांच्या स्वतंत्र बैठकाही घेतल्याचे समजते. आता बघेल व सिंहदेव यांच्या संपर्कात काँग्रेसचे महासचिव के. सी. वेणुगोपाल व पुनिया हे राहणार आहेत.

२०१८मध्ये छत्तीसगडमध्ये १५ वर्षांची भाजपची सत्ता काँग्रेसने आपल्याकडे खेचून घेतली होती. पण त्या विजयानंतर बघेल व सिंहदेव यांच्यात मुख्यमंत्रीपदावरून संघर्ष होता. पहिल्यांदा अडीच वर्षांचा मुख्यमंत्रीपदी राहण्याचा फॉर्म्युला काढण्यात आला होता. पण आता बघेल व पुनिया यांनी असा कोणताही फॉर्म्युला ठरलेला नाही, अशी भूमिका घेतली होती. त्यावर सिंहदेव यांचा गट नाराज झाला होता. गेल्या जुलै महिन्यात सिंहदेव यांनी गांधी कुटुंबियांची नवी दिल्लीत भेट घेऊन अडीच वर्षाच्या फॉर्म्युल्याची त्यांना आठवण करून दिली होती. त्या संदर्भात काँग्रेस व गांधी घराण्याकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नव्हती. नंतर बघेल यांना दिल्लीत बोलावून घेण्यात आले व त्यांनी गांधी कुटुंबियांशी चर्चा केल्यानंतर राज्यात कोणताही बदल होणार नाही, राज्यातील सरकार आघाडीचे नाही त्यामुळे सत्तावाटपाचा प्रश्न येत नाही, पण पक्षाध्यक्षांनी सांगितल्यास आपण आपले पद सोडून देऊ अशी प्रतिक्रिया बघेल यांनी दिली होती.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0