ऑस्ट्रियात दहशतवादी हल्लाः हल्लेखोरासह ५ ठार

ऑस्ट्रियात दहशतवादी हल्लाः हल्लेखोरासह ५ ठार

नवी दिल्लीः ऑस्ट्रियाची राजधानी व्हिएन्नामध्ये सोमवारी ६ ठिकाणी काही अज्ञात बंदुकधार्यांनी केलेल्या गोळीबारात ५ जण ठार झाले तर १५ जण जखमी झाले. मृतांम

काँग्रेस अध्यक्षाची प्रक्रिया सुरू; राहुल गांधींसंदर्भात अद्याप अनिश्चितता
‘फाटा’ची लोकशाहीकडे वाटचाल : ७० वर्षानंतर निवडणुका
जाहीर चर्चांची पुस्तकं

नवी दिल्लीः ऑस्ट्रियाची राजधानी व्हिएन्नामध्ये सोमवारी ६ ठिकाणी काही अज्ञात बंदुकधार्यांनी केलेल्या गोळीबारात ५ जण ठार झाले तर १५ जण जखमी झाले. मृतांमध्ये एका बंदुकधार्याचा समावेश आहे तर एक जण फरार झाला आहे. ऑस्ट्रियाचे चॅन्सलर सेबेस्टियन क्रुझ यांनी हा हल्ला दहशतवादी हल्ल्याचे सांगत नागरिकांनी घराच्या बाहेर पडू नये असे आवाहन केले आहे. हे दहशतवादी प्रशिक्षित होते व त्यांच्याकडे स्वयंचलित बंदुका होत्या. जखमी झालेल्या १५ नागरिकांमधील ७ जणांची प्रकृती गंभीर आहे.

ज्या ठिकाणी हल्ले झाले तो परिसर ज्यू धर्मियांचे प्रार्थनास्थळ होते पण या प्रार्थनास्थळांवर दहशतवादी हल्ला करणार होते की नाही, याबाबत सुरक्षा यंत्रणांनी माहिती दिली नाही. ही प्रार्थनास्थळे बंद होती. बंदुकधारी एका पबच्या बाहेर गोळीबार करताना दिसले असे एका ज्यू धर्मगुरुने सांगितले.

हा हल्ला झाल्यानंतर गृहमंत्री कार्ल नेहम्मर यांनी नागरिकांना गोळीबाराच्या घटना घडलेल्या ठिकाणापासून दूर राहण्यास सांगून सीमेवर कडक सुरक्षेचे आदेश दिले आहेत. ठार मारण्यात आलेला बंदुकधारी आयसीसचा असल्याचे गृहमंत्र्यांचे म्हणणे आहे.

२९ ऑक्टोबर रोजी फ्रान्समधील नीस शहरात एका हल्लेखोराने तीन जणांची चाकूने भोसकून हत्या केली होती. ही घटना एका चर्चमध्ये घडली होती. त्यानंतर जगभर खळबळ उडाली होती.

या अगोदर १६ ऑक्टोबर रोजी प्रेषित पैगंबरांचे व्यंगचित्र काढल्या प्रकरणात सॅम्युअल पाटी या शिक्षकाचा गळा चिरून खून करण्यात आला होता. हल्लेखोर मूळ चेचेन होता व पोलिसांनी नंतर त्याला ठार मारले होते.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0