अफवेमुळे वांद्र्यात जमाव रस्त्यावर, चौकशीचे आदेश

अफवेमुळे वांद्र्यात जमाव रस्त्यावर, चौकशीचे आदेश

मुंबई : कोरोना विषाणू संसर्ग अधिक फैलावू नये म्हणून देशव्यापी लॉकडाऊन ३ मे पर्यंत वाढवण्याचा निर्णय पंतप्रधान मोदींनी मंगळवारी जाहीर केला पण ट्रेन सुर

‘यूपीएससी जिहाद’ कार्यक्रम मुस्लिमांची बदनामी’
मृतांचा आकडा मीडियाने फुगवलाः गुजरात सरकार
पत्रकारितेसाठी भारत धोकादायक

मुंबई : कोरोना विषाणू संसर्ग अधिक फैलावू नये म्हणून देशव्यापी लॉकडाऊन ३ मे पर्यंत वाढवण्याचा निर्णय पंतप्रधान मोदींनी मंगळवारी जाहीर केला पण ट्रेन सुरू होणार अशी बातमी एका वृत्तवाहिनीने दिल्यानंतर आपापल्या घरी जाण्यासाठी परराज्यातील हजारो मजूर वांद्रे रेल्वेस्थानकावर जमा झाले. आपल्याला घरी जायचे आहे, तर रेल्वेने तशी सोय करावी अशी मागणी या हजारो मजुरांची होती. पण पोलिसांनी या जमावाला समजावून सांगितले व नंतर त्यांच्यावर लाठीमार करून पांगवले.

दरम्यान, ट्रेन सुरू होणार ही अफवा कोणी पसरवली याचा शोध गृहखात्याने सुरू केला असून गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्रेन चालू होणार या प्रकारची अफवा ज्यांनी पसरविली आहे त्याबद्दलचा तपास करण्याचे आदेश देण्यात आले आहे, तसेच याप्रकरणी चौकशी करून अफवा पसरविणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल, असे ट्विट केले आहे.

मंगळवारच्या दुपारच्या या घटनेनंतर राज्यातले वातावरण लगेच तापले. भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य प्रशासनाला परिस्थिती हाताळता येत नसल्याचा आरोप केला. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तातडीने टीव्हीवरून संवाद साधत हे  लॉकडाऊन म्हणजे लॉकअप नाही, हे ध्यानात घ्या. गावी जाण्याची घाई करू नका. राज्य सरकार तुमची संपूर्ण व्यवस्था करत आहे आणि यापुढेही करेल. त्यामुळे घाबरण्याचे कारण नाही, अशा शब्दांत दिलासा दिला.

उद्धव ठाकरे यांनी टीव्हीवरून संबोधताना हिंदीतून परराज्यातील मजुरांना आप परेशान क्यों हो रहे है, असाही सवाल विचारला. लॉकडाऊन संपल्यानंतर केंद्र व राज्य मिळून तुम्हाला तुमच्या गावी सोडण्याची व्यवस्था करेल, आता अजिबात चिंता करू नका, प्रत्येकाला पुरेसे  येईल अन्न मिळेल, कोणीही काळजी करू नये, असेही ते म्हणाले. वांद्रे येथे घडलेली घटना दुर्दैवी असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.

राज्य सरकारचा केंद्राशी सतत संपर्क असून आपण पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शहा, काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी संपर्क साधून आहोत असेही ठाकरे यांनी स्पष्ट केले.

यात कुणी राजकारण करणार असेल. लोकांच्या भावनांशी खेळून कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न करणार असेल तर तो कुणीही असला तरी कायद्याच्या कचाट्यातून सुटणार नाही. तेव्हा आग भडकवू नका, इतकीच माझी सर्वांना विनंती आहे, असे मुख्यमंत्र्यांनी बजावले.

घटना कशी घडली ?

एका वृत्तवाहिनीवर परराज्यातील मजुरांना परत घेऊन जाण्यासाठी रेल्वे सेवा सुरू करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे वृत्त मंगळवारी दुपारी प्रसिद्ध झाले. त्यानंतर सुमारे तीनच्या सुमारास परराज्यातील हजारो मजूर वांद्रे रेल्वे स्थानकानजीक जमा होऊ लागले. ही गर्दी एवढी वाढत गेली पोलिसांना मोठ्या प्रमाणात फौजफाटा घटनास्थळी तैनात करावा लागला.

वांद्रे स्थानकानजीक जमा झालेले बहुतांश मजूर हे पटेल नगर भागातील प. बंगाल व उ. प्रदेश राज्यातील असून ते झोपडपट्टीत राहणारे होते. या मजुरांनी आपल्याला घरी जायचे आहे व सरकारने कशीही करून आमची जाण्याची व्यवस्था करावी, असा आग्रह धरला. लॉकडाऊनमुळे आमच्या जगण्यावर मोठा परिणाम झाला असून जवळचे पैसे संपले आहेत. आता येथे आम्हाला अन्न नको पण घरी जायचे आहे, या लॉकडाऊनमुळे आमच्या उपजीविकेवर परिणाम झाल्याचे या मजुरांचे म्हणणे होते.

या मजुरांना समजावण्यासाठी काही स्वयंसेवक, पोलिस अधिकारी पुढे आले. नंतर न ऐकणार्या जमावावर पोलिसांनी लाठीमार करून त्यांना आपापल्या घरात पिटाळले.

या घटनेनंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी प्रत्येकाची खाण्याची व राहण्याची व्यवस्था सरकार करेल असे सांगितले, तर रात्री उशीरा अफवा पसरवण्यांवर कारवाई करण्यात येईल असे ट्विटवर जाहीर केले.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0