हिजाब याचिकाकर्तीच्या भावाच्या खानावळीवर जमावाचा हल्ला

हिजाब याचिकाकर्तीच्या भावाच्या खानावळीवर जमावाचा हल्ला

बंगळुरूः हिजाब प्रकरणात कर्नाटक उच्च न्यायालयात याचिका दाखल करणाऱ्या उडुपी येथील मुस्लिम तरुणीच्या भावाच्या खानावळीवर सोमवारी रात्री साडेनऊच्या सुमारा

राज्यातल्या ७५ टक्के मंत्र्यांवर फौजदारी गुन्ह्यांची नोंद
कर्नाटकात मुस्लिम विद्यार्थ्यांची संख्यामोजणी सुरू
ईडी, केजरीवालांचे सहाय्यक, नीती आयोग पिगॅससच्या लक्ष्यस्थानी

बंगळुरूः हिजाब प्रकरणात कर्नाटक उच्च न्यायालयात याचिका दाखल करणाऱ्या उडुपी येथील मुस्लिम तरुणीच्या भावाच्या खानावळीवर सोमवारी रात्री साडेनऊच्या सुमारास ५० जणांच्या जमावाने हल्ला केला. या हल्ल्यात खानावळीची मोठ्या प्रमाणात नासधुस करण्यात आली तसेच याचिकाकर्तीचा भाऊ, वडील यांना जमावाने मारहाण केली. जमावाने खानावळीवर दगडफेकही केली.

ही घटना कळल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन जमावाला पांगवले. पोलिसांनी या प्रकरणी दंगल भडकवण्याचा गुन्हा दाखल केला असून जमावातील व्यक्तींची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक झालेली नाही. हा जमाव कट्टरवादी हिंदू गटाचा असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

पोलिसांच्या मते याचिकाकर्तीचा भाऊ स्थानिक टीव्हीवर हिजाबवरील चर्चेत सहभागी झाला होता. त्यासंदर्भात जाब विचारण्यासाठी जमाव खानावळीवर चालून आला होता.

हत्या प्रकरणी ६ जणांना अटक

दरम्यान, शिमोगातील बजरंग दलाच्या कार्यकर्त्याच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी ६ जणांना ताब्यात घेतले. या सहाजणांवर यापूर्वी पोलिस दफ्तरी गुन्ह्यांची नोंद असून या हत्येचा कर्नाटकातील हिजाब प्रकरणाशी नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

रविवागी शिमोगा जिल्ह्यात बजरंग दलाचा २३ वर्षाचा कार्यकर्ता हर्षा याची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली होती. रविवारी रात्री साडे नऊच्या सुमारास भारती कॉलनीमध्ये काही अज्ञात हल्लेखोरांनी हर्षा याच्यावर हल्ला केला. त्यात हर्षा जागीच ठार झाला. हर्षा विणकर म्हणून काम करत होता. हर्षाच्या हत्येनंतर बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी काही वाहनांना आग लावली व दगडफेक केली. शिमोगामध्ये काही दिवसांपासून हिजाब प्रकरणावरून तणाव पसरला होता.

हर्षाच्या हत्येनंतर शिमोगा येथे १४४ कलम लावण्यात आले होते व सर्व शैक्षणिक संस्था बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले होते. या हत्येप्रकरणी पोलिसांनी १२ जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: