बर्नी सँडर्स यांचा नेवाडामध्ये मोठा विजय

बर्नी सँडर्स यांचा नेवाडामध्ये मोठा विजय

सँडर्स यांच्या शनिवारच्या या विजयातून दिसून आले की त्यांच्या सामाजिक आणि आर्थिक न्यायाच्या स्पष्ट संदेशाला अधिकाधिक डेमोक्रॅटिक मतदारांचा पाठिंबा मिळत आहे.

बर्ट्रंड रसेलची तत्त्वज्ञानात्मक लेखनशैली
एअर इंडिया, भारत पेट्रोलियमची विक्री : सीतारामन
अफगाणिस्तान : जी ७ देशांची तातडीची बैठक

नेवाडा येथील मोठ्या विजयानंतर बर्नी सँडर्स यांनीअमेरिकन डेमोक्रॅटिक पक्षाच्या अध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठीच्या शर्यतीतील आपली आघाडी मजबूत करण्याच्या दिशेने आणखी एक पाऊल टाकले आहे. पुढच्या १० दिवसांतल्या १५ लढतींमध्ये त्यांचा हा रथ रोखण्यासाठी त्यांचे स्पर्धक शर्थीचे प्रयत्न करत आहेत.

व्हरमाँट येथील स्वतंत्र सिनेटर आणि स्वयंघोषित डेमोक्रॅटिक सोशालिस्ट असलेले सँडर्स यांना नेवाडा येथे जमलेल्या प्रतिनिधींपैकी सर्व वयाच्या, वंशाच्या आणि विचारप्रणालींच्या लोकांमधून मोठा पाठिंबा मिळाला.

माजी उपाध्यक्ष जो बिडेन यांना नेवाडा येथे द्वितीय स्थान मिळाले. मात्र ते सँडर्स यांच्या बरेच मागे होते. आयोवा आणि न्यू हँपशायर येथील लढतींमध्येही बिडेन यांची कामगिरी सुमार होती.

पीट बुटिगेग, साऊथ बेंड, इंडियानाचे माजी मेयर यांनी आयोवा येथे विजय मिळवला होता आणि न्यू हँपशायर येथे दुसरे स्थान मिळवले होते. नेवाडा मध्ये त्यांना तिसरे स्थान मिळाले. मात्र अंतिम निकालात बुटिगेग यांना १५% पेक्षा कमी पॉइंट्स मिळाले तर त्यांना नॉमिनेशन मिळवणे कठीण जाऊ शकते.

सँडर्स यांच्या या विजयामुळे प्रस्थापित डेमोक्रॅट्सची चिंता वाढली असेल. त्यांच्या मते नोव्हेंबरमधील अध्यक्षपदाच्या निवडणुकीच रिपब्लिकन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव करण्याच्या दृष्टीने सँडर्स हे फारच जास्त उदारमतवादी आहेत. सँडर्स यांची विजयी घोडदौड अशीच चालू राहिली तर त्यांच्या काळजीत भर पडेल.

पण नेवाडातील निकाल आणि येणाऱ्या लढतींसाठीचा दृष्टिकोन उर्वरित इच्छुकांमधील काहींना बाहेर काढण्यासाठी फारसे उपयोगी ठरलेले नाहीत, आणि अधिक मध्यममार्गी उमेदवारांचा एक मोठा समूह रिंगणात राहिला आहे. त्यामुळे सँडर्स यांच्या विरोधातील मते विभाजित होत आहेत आणि या उमेदवारांपैकी कोणीही आवश्यक गती मिळवू शकलेले नाही.

डेमोक्रॅटिक शर्यतीत एके काळी आघाडीवर असणारे बिडेन हे बुधवारी काँग्रेसमधील वरिष्ठ आफ्रिकन अमेरिकन प्रतिनिधी जिम क्लायबर्न यांचे समर्थन मिळवणार आहेत. जिम क्लायबर्न हे साऊथ कॅरोलिनामधील प्रतिनिधी आहेत, व डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवारीसाठीची पुढची लढत साऊथ कॅरोलिना राज्यातच होणार आहे.

शनिवारी सँडर्स यांना मिळालेला विजय हा वांशिक वैविध्य असलेल्या राज्यांमधला पहिला विजय आहे. त्यांच्या सामाजिक आणि आर्थिक न्यायाच्या स्पष्ट संदेशाला, ज्यामध्ये सर्व अमेरिकन लोकांना सर्वसाधारण आरोग्यसेवा पुरवण्याचे आश्वासनही समाविष्ट आहे, अधिकाधिक डेमोक्रॅटिक मतदारांचा पाठिंबा मिळत असल्याचेच यातून दिसून येत आहे.

“एकत्रितपणे आपण या देशाच्या आधुनिक इतिहासातील सर्वात धोकादायक अध्यक्षाचा पराभव करू,” ह्यूस्टनमध्ये सँडर्स त्यांच्या समर्थकांपुढे बोलताना म्हणाले. त्यानंतर ऑस्टिन, टेक्सास येथील सभेत त्यांनी माजी स्पर्धक मरियन विल्यम्सन यांचे समर्थन मिळवले.

बिडेन यांना क्लायबर्न यांचे संभाव्य समर्थन, नागरी अधिकारांबाबतचे त्यांचे काम तसेच पहिले काळे अध्यक्ष बराक ओबामा यांचे क्रमांक २ चे सहकारी म्हणून केलेले काम यामुळे साऊथ कॅरोलिनामधील अनेक आफ्रिकन अमेरिकन मतदारांचा पाठिंबा मिळण्याची आशा आहे.

मात्र काळ्या मतदारांमधील त्यांची वरचढ स्थिती सँडर्स आणि अब्जाधीश कार्यकर्ता टॉम स्टेयर यांच्यामुळे तितकीशी वरचढ राहिलेली नाही.

(रॉयटर्स)

मूळ लेख

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: