८ डिसेंबरच्या भारत बंदमध्ये काँग्रेससह डावे पक्ष सामील

८ डिसेंबरच्या भारत बंदमध्ये काँग्रेससह डावे पक्ष सामील

नवी दिल्लीः केंद्र सरकारने ३ वादग्रस्त शेती कायदे रद्द करावेत म्हणून ८ डिसेंबरला पुकारण्यात आलेला भारत बंद यशस्वी व्हावा म्हणून देशातल्या सर्व राज्यात

शेती कायद्यावर सरकार मवाळ, पण पेच कायमच
नेटीझन्सच्या दबावापुढे झुकरबर्गही झुकला
दुसरी हरित क्रांती..

नवी दिल्लीः केंद्र सरकारने ३ वादग्रस्त शेती कायदे रद्द करावेत म्हणून ८ डिसेंबरला पुकारण्यात आलेला भारत बंद यशस्वी व्हावा म्हणून देशातल्या सर्व राज्यातल्या शेतकरी संघटनांना एकत्र आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्याचबरोबर या आंदोलनात देशातील काँग्रेससह अन्य विरोधी पक्षही सामील होणार असून ते निदर्शनांत सहभागी होणार आहेत. हा भारत बंद पंजाब, हरयाणा, उ. प्रदेश, उत्तराखंड, राजस्थानमध्ये तीव्र होईल यासाठी शेतकरी संघटना आक्रमक झाल्या आहेत. या बंदमध्ये देशातल्या ४०० हून अधिक शेतकरी संघटना सामील होणार आहेत.

दरम्यान, रविवारी काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेरा यांनी ८ डिसेंबरच्या भारत बंदमध्ये काँग्रेस सामील असल्याचे जाहीर करत देशातील सर्व राज्यांमध्ये काँग्रेसचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरतील असे सांगितले.

या बंदमध्ये काँग्रेसव्यतिरिक्त महाराष्ट्रातून राष्ट्रवादी काँग्रेस, प. बंगालमधून तृणमूल काँग्रेस, बिहारमधून राष्ट्रीय जनता दल, उ. प्रदेशातून राष्ट्रीय लोक दल, राष्ट्रीय लोक समता पार्टी, समाजवादी पार्टीचे कार्यकर्ते सामील होणार आहेत. डाव्या पक्षांमध्ये माकप, भाकप, माकप (माले), आरएसपी, ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक हे पक्ष सामील होणार आहेत.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0