चंदीगडः दिल्लीच्या वेशीवर पेटलेल्या शेतकरी आंदोलनात भाजपची साथ देत असल्याने हरियाणाचे उप-मुख्यमंत्री दुष्यंता चौटाला व भाजपचे हिसार येथील खासदार बृजें
चंदीगडः दिल्लीच्या वेशीवर पेटलेल्या शेतकरी आंदोलनात भाजपची साथ देत असल्याने हरियाणाचे उप-मुख्यमंत्री दुष्यंता चौटाला व भाजपचे हिसार येथील खासदार बृजेंद्र सिंह यांच्यावर सामाजिक बहिष्कार घालण्याची घोषणा जींद जिल्ह्यातील उचाना भागातील काही खाप नेत्यांनी शनिवारी केली.
मोदी सरकारकडून वादग्रस्त ३ शेती कायदे राबवले जात असून त्याला विरोध करण्याऐवजी हे दोन नेते समर्थन करत असून या दोघांच्या मतदारसंघात आंदोलनाचे वाढते समर्थन असताना त्याक़डे राजकीय हेतूने दुर्लक्ष केले जात असल्याच्या खाप नेत्यांचे म्हणणे आहे.
दुष्यंत चौटाला यांचा विधानसभा मतदारसंघ उचाना हा असून हा मतदारसंघ हिसार लोकसभा मतदारसंघात येतो. हा मतदारसंघ भाजपकडे आहे. या मतदारसंघात सध्याचे लोकसभा खासदार बृजेंद्र सिंह यांचे वडील चौधरी बिरेंदर सिंह अनेकवेळा निवडून येत होते. आता खाप नेत्यांनी चौधरी बिरेंदर सिंह यांच्यावरही सामाजिक बहिष्कार घालण्याची घोषणा केली आहे.
खाप नेता बलवान पहलवान यांनी, आम्ही सर्वसंमतीने भाजपाच्या नेत्यांवर बहिष्कार घालण्याचे ठरवले असून जींद जिल्ह्यातील बांगर येथील सर्व भाजप नेत्यांवर आम्ही सामाजिक बहिष्कार घातला आहे, असे सांगितले. या भागात येणार्या भाजप नेत्यांना काळे झेंडे दाखवण्यात येतील. त्यांच्याशी जोपर्यंत सामाजिक बहिष्कार असेल तोपर्यंत चर्चाही करण्यात येणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. हरियाणातल्या खाप पंचायतीने कुणावर सामाजिक बहिष्कार घातल्यास त्या व्यक्तीसोबत कोणीही हुक्का पीत नाही व त्यांना हुक्का पिण्यास बोलवले जात नाही.
मूळ बातमी
COMMENTS