कोरोनाशी लढ्याचा भिलवाडा पॅटर्न

कोरोनाशी लढ्याचा भिलवाडा पॅटर्न

२२ लाख लोकसंख्या असलेल्या भिलवाडामध्ये कोरोनाच्या ३८०० चाचण्या केल्या गेल्या आणि २८ प्रकरणे नोंदवण्यात आली. त्यातील दोघांचा मृत्यू झाला आणि १७ जण बरे झाले. त्यातील ९ जणांना घरी पाठवण्यात आले आहे.

निराळ्या पीएम-केअर फंडाची गरज काय?
गोव्यात ऑक्सिजन अभावी ४८ तासांत ४७ कोरोना रुग्णांचा मृत्यू
राम नवमी : काही ठिकाणी लॉकडाऊनला फाटा

कोरोना विषाणूच्या उद्रेकावरील प्रतिबंध उपाययोजना जारी करताना केंद्र सरकारने भिलवाडा मॉडेलचे कौतुक केले. राजस्थानमधल्या या प्रदेशाने एका हॉटस्पॉटमध्ये कोरोना विषाणूच्ये उद्रेकाचा सामना करण्यासाठी सर्वाधिक यशस्वी उपाययोजना केल्याचे दिसून आले आहे.

भिलवाड्यामधील कोरोना विषाणूचा उद्रेक मार्चच्या पहिल्या आठवड्यात जिल्ह्यातील सर्वांत मोठे खासगी रूग्णालय असलेल्या ब्रिजेश भांगर मेमोरियल हॉस्पिटलमधील (बीबीएम) डॉक्टरांनी एका कोरोनाग्रस्त रूग्णावर आपल्या नेहमीच्या रूग्णाप्रमाणेच उपचार सुरू केल्यावर झाला.

कोरोना विषाणूच्या प्रसाराबाबत माहिती प्रसारित केली जात असतानाही या रूग्णाला आपल्या प्रवासाबाबत माहिती विचारली गेली नाही आणि त्यानेही ती सांगितली नाही.

त्यांना इतर सहा रूग्णांसोबत आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले. दोन दिवसांनी त्यांच्या प्रकृतीत कोणतीही सुधारणा न झाल्यामुळे त्यांना जयपूरमधील खासगी रूग्णालयात उपचारासाठी पाठवले गेले.

जयपूरमध्येही त्यांना गंभीर न्यूमोनिया असतानाही कोरोना विषाणूची चाचणी कऱण्यात आली नाही. त्यांचे १३ मार्च रोजी निधन जाले.

दरम्यान, त्यांच्यावर उपचार करणारे भिलवाडामधील डॉक्टर्स उदयपूरला होळीसाठी गेले.

काही दिवसांनी यातील काही डॉक्टरांची नोव्हेल कोरोना विषाणूची चाचणी पॉझिटिव्ह आली. त्यामुळे भिलवाड्यात खळबळ उडाली कारण साधारण एक आठवड्यापूर्वी कोरोनाग्रस्त रूग्णावर उपचार केल्यानंतर हे डॉक्टर्स किमान ५० हजार लोकांच्या संपर्कात आले होते.

त्यामुळे उद्रेकाच्या समाजातील संक्रमणाचे भारतातील पहिले क्षेत्र म्हणून भिलवाडा घोषित झाले.

बीबीएम रूग्णालयातील डॉक्टरांची चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर दोन दिवसांत जिल्ह्यात दोन प्रकरणांची नोंद झाली. पॉझिटिव्ह आलेल्या लोकांमध्ये मुख्यत्वे या संसर्गित डॉक्टरांच्या संपर्कात आलेले डॉक्टर्स, कर्मचारी आणि रूग्ण होते.

३० मार्चपर्यंत एकूण २६ प्रकरणे नोंदवण्यात आली. या जिल्ह्यात कर्फ्यू लावण्यात आला. तिथे किराणा आणि औषध दुकानांसारखी महत्त्वाची दुकानेही बंद करण्यात आली. प्रशासनाने पोलिसांना या कालावधीत होम डिलिव्हरीवर परिणाम होणार नाही याची काळजी घेण्याच्या सूचना दिल्या.

इतर अनेक राज्यांप्रमाणेच भिलवाडानेही आपल्या सीमा बंद केल्या आणि सुरूवातीच्या टप्प्यातच रस्त्यांवरील वाहने मर्यादित केली.

त्यांनी क्लस्टर शोधले आणि पॉझिटिव्ह आलेल्या रूग्णांच्या संपर्कात आलेल्या इतरांना वेगळे केले. इन्फ्लुएंझासारखी लक्षणे शोधण्यासाठी मोठ्या प्रमाणावर तपासण्या करण्यात आल्या.

डॉक्टर्स, सहाय्यक परिचारिका, दाई (एएनएम) आणि नर्सिंग विद्यार्थी यांच्यासह सुमारे ८५० टीम्सच्या माध्यमातून भिलवाडा प्रशासनाने ५६००० घरांमध्ये सर्वेक्षण केले आणि सुमारे २.८ लाख लोकांना तपासले. संसर्ग झाल्याची शक्यता असलेल्या सुमारे सहा हजार लोकांना घरीच विलगीकरणात ठेवण्यात आले.

द वायरसोबत बोलताना आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव रोहितकुमार सिंग म्हणाले की, प्रत्येकाला मॉडेल माहीत आहे, तुम्ही अंमलबजावणी कशी करता हे महत्त्वाचे आहे. त्यात दोन मूलभूत गोष्टी होत्या. एक म्हणजे आम्ही लवकर कृती केली आणि दुसरे म्हणजे आम्ही त्याची आक्रमकतेने अंमलबजावणी केली. त्यामुळे लोकांची गैरसोय झाली परंतु दूध, भाज्या आणि औषधे यांच्यासारख्या अत्यावश्यक वस्तूंच्या पुरवठ्याच्या परिणामकारक यंत्रणेमुळे ती दूरही झाली. यातील महत्त्वाची गोष्ट म्हणजे आक्रमक अंमलबजावणी आणि त्याचबरोबर अत्यावश्यक गोष्टींची पुरवठा साखळ कायम ठेवणे ही आहे.

नागरिक त्याकडे कसे बघतात हे अधिक महत्त्वाचे आहे. तुम्ही एखादा प्रस्ताव प्रयत्न करून लादण्याचा प्रयत्न केल्यास नागरिक त्याचे उल्लंघन करतात. त्यामुळे आम्ही कठोर आणि नम्र या दोन्ही प्रकारे काम केले, असे ते म्हणाले.

तज्ज्ञांच्या मते नुकसानाचा विचार न करता संसर्ग प्रतिबंधित करण्याचा प्रयत्न केल्यास त्यातून दीर्घकालीन समस्या निर्माण होऊ शकतात.

फक्त आक्रमक लॉकडाऊनवर भर दिला जातो ही एक समस्या आहे. त्याच्याशी संबंधित नुकसानाचा विचार न केल्यास त्याचा आरोग्य, पोषण, इतर आजार, सुरक्षा, राहणीमान, वेतन, शिक्षण, अन्नसुरक्षा इत्यादी दीर्घकालीन गंभीर परिणाम होऊ शकतो, असे मत कर्नाटकातील डॉक्टर आणि संशोधक सिल्विया कर्पागम यांनी व्यक्त केले.

आजपर्यंत २२ लाख लोकसंख्या असलेल्या भिलवाडामध्ये कोरोनाशी संबंधित ३८०० चाचण्या केल्या गेल्या आहेत आणि आतापर्यंत २८ प्रकरणे नोंदवण्यात आली. त्यातील दोघांचा मृत्यू झाला आणि १७ लोक बरे झाले. त्यातील ९ लोकांना घरी पाठवण्यात आले आहे.

येथील १७ कोविड-१९ रूग्णांना टॅमीफ्लू, एचआयव्हीशी संबंधित औषधे आणि हायड्रोक्सिक्लोरोक्विन (एचसीक्यू) यांच्या उपचारांचा फायदा झाल्याचे सांगितले.

भारतातील पहिला कोरोना हॉटस्पॉट मानला गेलेल्या भिलवाडा जिल्ह्यात आजाराला आळा घालण्यासाठी वापरलेल्या धोरणाला भिलवाडा पॅटर्न असे नाव दिले गेले आहे. येथे ३० मार्च फक्त दोन कोरोनाच्या घटना दिसल्या आहेत. त्यातील एक ४ एप्रिल आणि दुसरी ९ एप्रिल रोजी घडली आहे.

तथापि, एखाद्याने आजार नियंत्रणाखाली आणल्याचा दावा केला असेल किंवा सिद्ध केलेले असल्यास त्या स्पर्धेत माहिती दाबून ठेवण्याचे प्रकार घडू शकतात, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. कर्पागम यांच्या मते कोणतीही शिक्षा न होता, आकडेवारीवर न चालणारी आणि कोणत्याही प्रकारे ठपका न ठेवता चालवली जाणारी उपचारपद्धती अत्यंत महत्त्वाची आहे.

“जिल्हा पातळीवरील समन्वय अत्यंत महत्त्वाचा आहे आणि त्यातून वापरल्या जाणाऱ्या पद्धतीचा उपयोग इतर क्षेत्रात केला जाऊ शकतो,” असे त्या म्हणाल्या.

भिलवाड्याचे जिल्हा दंडाधिकारी राजेंद्र भट्ट यांनीही भिलवाड्याला कोरोना विषाणूचा सामना करण्यासाठी एक आदर्श म्हणून समोर ठेवण्यास ही खूप घाई होईल. आपण १ मे पर्यंत वाट पाहिली पाहिजे आणि तोपर्यंत आम्ही विषाणूचे पूर्णपणे उच्चाटन केले आहे याची खात्री केली पाहिजे असे मत राजेंद्र भट्ट यांनी प्रिंटला सांगितले.

“विजयाचा दावा करण्यापूर्वी आपण विलगीकरण, तपासणी आणि आणि क्वारंटाइन यांची तीन चक्रे पूर्ण केली पाहिजेत असे मला वाटते,” असे ते म्हणाले. कर्पागम यांनी असेही सांगितले की एखाद्या ठिकाणी यशस्वी ठरलेले मॉडेल इतर ठिकाणी यशस्वी ठरेल असे नाही.

“कर्नाटकातील कोविड-१९च्या कृती दलाचा भाग असलेल्या देवी शेट्टी यांनी सांगितले की, ब्रिटनमध्ये तीन मोठी सरकारी रूग्णालये कोविड रूग्णालयांमध्ये परावर्तित केली गेली. परंतु कर्नाटकात, त्यामुळे सरकारच्या अत्यावश्यक तृतीयक सेवा कार्यावर गंभीर परिणाम झाला,” असे त्या म्हणाल्या.

कर्पागम यांच्या मते भिलवाडा मॉडेलचा अंगीकार केल्याने एक धोका होऊ शकतो. तो म्हणजे संपूर्ण देशभरात कर्फ्यू लावण्याचे त्यांना एक निमित्त मिळू शकते.

मूळ लेख

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0