नीता अंबानींना बीएचयूमध्ये विरोध

नीता अंबानींना बीएचयूमध्ये विरोध

वाराणसीः रिलायन्स इंडस्ट्रीजच्या कार्यकारी संचालक नीता अंबानी यांना बनारस हिंदू विद्यापीठात अतिथी प्राध्यापकपद देण्याच्या प्रस्तावाला विद्यापीठातील सर

अदानी समूहाच्या मानहानीच्या दाव्यात पत्रकार रवी नायर यांच्याविरुद्ध वॉरंट
उद्योगपती गौतम अदानी यांना ‘झेड’ सुरक्षा
अदानी समूह एनडीटीव्ही खरेदी करण्याच्या तयारीत

वाराणसीः रिलायन्स इंडस्ट्रीजच्या कार्यकारी संचालक नीता अंबानी यांना बनारस हिंदू विद्यापीठात अतिथी प्राध्यापकपद देण्याच्या प्रस्तावाला विद्यापीठातील सर्व विद्यार्थी संघटनांनी जोरदार विरोध केला आहे. महिला सबलीकरणावर ज्यांनी मूलभूत कार्य केले आहे, अशांना अतिथी प्राध्यापक म्हणून विद्यापीठाने बोलवावे पण देशातल्या  एका बड्या भांडवलदाराची पत्नी म्हणून नीता अंबानी यांना अतिथी प्राध्यापक म्हणून बोलवणे कितपत योग्य आहे, असा सवाल आंदोलनाला बसलेला एक विद्यार्थी शुभम तिवारी यांनी उपस्थित केला आहे.

मंगळवारी ४० विद्यार्थ्यांच्या एका गटाने कुलपती राकेश भटनागर यांची भेट घेऊन त्यांना एक निवेदन दिले. या निवेदनात नीता अंबानी यांना अतिथी प्राध्यापकपदी नियुक्ती करून विद्यापीठ प्रशासन चुकीचा पायंडा पाडत असल्याचा खेद व्यक्त केला गेला आहे.

बनारस विद्यापीठातील सामाजिक शास्त्र विभागाला रिलायन्स फाउंडेशनने नुकताच प्रस्ताव पाठवला होता. या प्रस्तावात नीता अंबानी यांची विद्यापीठात अतिथी प्राध्यापकपदी नियुक्ती करावी अशी विनंती करण्यात आली होती, त्याला उत्तर म्हणून विद्यापीठाने अंबानी यांच्या नावावर पसंती दाखवली होती.

बनारस विद्यापीठाकडे अन्य बडे उद्योगपती गौतम अडानी यांची पत्नी प्रीति अडानी व भारतीय वंशाचे ब्रिटीश पोलाद सम्राट लक्ष्मी मित्तल यांची पत्नी उषा मित्तल यांच्या नावाचीही अतिथी प्राध्यापक म्हणून शिफारस आली आहे. त्यांच्या नावावर अद्याप सहमती झाली नसल्याचे विद्यापीठातील काही अधिकार्यांचे म्हणणे आहे.

विद्यापीठातील सामाजिक शास्त्र विभागात महिला अभ्यास केंद्र असून त्यातील तीन पदे ही अतिथी प्राध्यापकांसाठी राखीव असतात. या शाखेच्या प्रमुख कौशल किशोर मिश्रा यांनी दानशूर उद्योगपतींना विद्यापीठाच्या कार्यात सामील करून घेण्याची विद्यापीठाची जुनी परंपरा आहे, त्या अनुषंगाने नीता अंबानी यांना अतिथी प्राध्यापक म्हणून घेण्यात आले आहे, असे मत व्यक्त केले आहे. अशा महिला उद्योजकांचा विद्यापीठातील महिला सक्षमीकरण कार्यात मदत होत असते. त्यांच्या अनुभवाचा लाभ महिलांना होत असतो. रिलायन्स उद्योग समूहाने महिला सशक्तीकरणावर अनेक कामे केली आहेत, असे मिश्रा यांचे म्हणणे आहे. अंबानी या सक्षम महिला उद्योजक आहे, त्यांचा फायदा पूर्वेकडील महिलांना अधिक होईल असाही दावा मिश्रा यांनी केला आहे.

दरम्यान नीता अंबानी यांच्या अशा प्रस्तावाबाबतची माहिती आपल्याला नाही, अशी प्रतिक्रिया कुलपती भटनागर यांनी दिली आहे.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0