भाजपमध्ये येण्याची ऑफर आली: मनीष सिसोदिया

भाजपमध्ये येण्याची ऑफर आली: मनीष सिसोदिया

सीबीआयने दिल्ली उत्पादन शुल्क धोरणाच्या अंमलबजावणीतील कथित अनियमिततेच्या संदर्भात नोंदवलेल्या एफआयआरमध्ये उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्यासह १५ इतर लोकांची नावे घेतली आहेत. जुलै महिन्यात दिल्लीचे उपराज्यपालांनी अबकारी धोरणातील अनियमिततेबाबत सीबीआय चौकशीची शिफारस केली होती.

२२ तासानंतर दिल्लीची मतदान टक्केवारी (६२.५९ टक्के) जाहीर
दिल्लीत ‘आप’चा एकतर्फी विजय
दंगलप्रकरणी ‘आप’च्या ताहीर हुसेन यांच्यावर गुन्हा दाखल

नवी दिल्ली: दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी सोमवारी दावा केला की भारतीय जनता पक्षाने (भाजप) पक्षात प्रवेश घेतल्यास त्यांच्यावरील सर्व खटले बंद करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे.

आपल्यावरील सर्व आरोप खोटे असल्याचे सांगून सिसोदिया म्हणाले की, “षड्यंत्र करणारे आणि भ्रष्ट लोकांपुढे मी कधीही झुकणार नाही.”

विशेष म्हणजे, केंद्रीय अन्वेषण ब्यूरो (CBI) ने दिल्ली उत्पादन शुल्क धोरणाच्या अंमलबजावणीतील कथित अनियमिततेच्या संदर्भात नोंदवलेल्या एफआयआरमध्ये सिसोदिया आणि इतर १५ लोक आणि संस्थांची नावे आहेत.

आम आदमी पार्टीचे (आप) नेते सिसोदिया यांनी ट्विट केले, ‘मला भाजपकडून संदेश मिळाला आहे – ‘आप’ सोडा आणि भाजपमध्ये या, तुमच्यावरील सर्व सीबीआय आणि ईडी खटले बंद केले जातील.’

उपमुख्यमंत्री म्हणाले, ‘भाजपला माझे उत्तर आहे, मी महाराणा प्रताप यांचा वंशज आहे आणि राजपूत आहे. मी शिरच्छेद करून घेईन, पण भ्रष्ट, कारस्थान करणाऱ्यांपुढे झुकणार नाही. माझ्यावरील सर्व खटले खोटे आहेत. तुम्हाला जे काही करायचे आहे ते करा.’

भाजपने यावर प्रतिक्रिया दिली असून सिसोदिया यांच्या दाव्याला खोटे  म्हटले आहे.

अशी विधाने करून दिल्लीतील सत्ताधारी आम आदमी पार्टी उत्पादन शुल्क धोरणाशी संबंधित कथित भ्रष्टाचाराचे प्रकरण दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप भाजपने केला आहे.

भाजपचे प्रवक्ते गौरव भाटिया यांनी पक्ष मुख्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले, की ‘मी एवढंच म्हणेन की ज्यांची नियत खोटी आहे, त्यांचे विचारच छोटे आहेत, त्यांना कोणी काय फोडणार?’

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर निशाणा साधत ते म्हणाले की, त्यांचा अहंकार दिल्लीतील जनता मोडीत काढत आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0