जहांगिरपुरी दंगलीमागे भाजपचः आपचा आरोप

जहांगिरपुरी दंगलीमागे भाजपचः आपचा आरोप

नवी दिल्लीः शहरातील जहांगीरपुरी भागात झालेली दंगल भाजपच्या स्थानिक नेत्याने घडवून आणली असून या दंगलीमागे भाजपचा हात असल्याचा सनसनाटी आरोप आम आदमी पार्

केजरीवाल यांचा पारंपरिक सिद्धांतांना छेद
मोफत मेट्रो-बससेवा
‘आप’चाच भाजपला करंट

नवी दिल्लीः शहरातील जहांगीरपुरी भागात झालेली दंगल भाजपच्या स्थानिक नेत्याने घडवून आणली असून या दंगलीमागे भाजपचा हात असल्याचा सनसनाटी आरोप आम आदमी पार्टीने मंगळवारी एक पत्रकार परिषद घेऊन केला. आपचे आमदार सौरभ भारद्वाज यांनी एक पत्रकार परिषद घेत जहांगिरपुरी दंगलीमागे भाजपचा हात असल्याचे आरोप केले. भाजपने संघटितरित्या दंगल घडवून आणली, या दंगलीचा फायदा व तोटा कोणाला झाला, भाजपला यातून काय साध्य करायचे आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

आपच्या कालकाजी येथील आमदार आतिशी यांनीही एक ट्विट करत दिल्ली पोलिसांनी जहांगीरपुरी दंगल घडवून आणणाऱ्या ज्या ३५ वर्षीय मोहम्मद अन्सार याला अटक केली आहे, तो नेता भाजपचा असल्याचा दावा केला. आतिशी यांनी अन्सार याचे छायाचित्रही प्रसिद्ध केले. अन्सार याने जहांगिरपुरी येथील भाजपच्या नेत्या संगीता बजाज यांचा २०१७ रोजी झालेल्या महानगर पालिका निवडणुकांत प्रचार केला होता. अन्सारया प्रचारात हजर असतानाचे अनेक फोटो तिशी यांनी ट्विटवर प्रसिद्ध केले. तिशी यांनी जहांगिरपुरी दंगल भाजपनेच घडवून आणली असेहीथेट सांगितले. त्यांनी हिंदीतही ट्विट केले आहे.

हनुमान जयंतीच्या दिवशी उसळलेल्या जहांगिरपुरी दंगलप्रकरणात पोलिसांनी १७ एप्रिलला मोहम्मद अन्सार याला अटक केली. अन्सारच या दंगलीचा मुख्य सूत्रधार असल्याचे दिल्ली पोलिसांचे म्हणणे आहे. अन्सार याने आपल्या चार-पाच साथीदारांसह हनुमान जयंतीच्या मिरवणुकीत घुसून काही जणांना मारहाण करण्यास सुरूवात केली आणि त्यामुळे दंगल उसळली असे पोलिसांचे म्हणणे आहे.

दिल्ली पोलिसांच्या मते ही मिरवणूक शांततेत जात होती पण अचानक तिला हिंसक रुप आले. मात्र दिल्ली पोलिसांच्या या दाव्याला छेद देणारे अनेक व्हीडिओ सोशल मीडियात प्रसिद्ध झाले आहेत. या व्हीडिओंमध्ये मिरवणुकीत सामील झालेले तरुण मुद्दाम मशिदीच्या आसपास उभ्या असलेल्या मुस्लिमांना चिथावणी देत असल्याचे दिसत होते.

दिल्ली पोलिसांनी अन्सारला ताब्यात घेतल्यानंतर सोमवारी भाजपच्या प्रवक्त्या सारिका जैन यांनी अन्सार हा आपचा कार्यकर्ता असल्याचा आरोप केला. अन्सारच्या डोक्यावर आपची टोपी असल्याचेही त्यांचे म्हणणे होते.

  • भाजपने अन्सारचे नाव घेतल्यानंतर अनेक वृत्तवाहिन्यांनी अन्सारच्या हातात तलवार असल्याचे फोटो प्रसिद्ध करण्यास सुरूवात केली होती.

मात्र मंगळवारी आपने अन्सार हा भाजपचा कार्यकर्ता असल्याचे अनेक फोटो ट्विट केल्याने हा वाद अधिक चिघळला आहे.

अन्सार याची पार्श्वभूमी गुन्हेगारी स्वरुपाची आहे. त्याच्याविरोधात २००७ पासून अनेक गुन्हे दाखल झाले आहेत. अन्सार हा अवैधरित्या देशीदारू विकत होता, तसेच तो मटकाही चालवत होता. त्याला या अगोदर दिल्ली पोलिसांनी अनेक वेळा ताब्यात घेतले होते.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0