सरकार पाडण्याचा भाजपचा डाव – कॉँग्रेस

सरकार पाडण्याचा भाजपचा डाव – कॉँग्रेस

मुंबई : महाराष्ट्रातील सरकार पाडण्याचा भाजपचा डाव असल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून होऊ लागला आहे. कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन

लोकांनी मरावे असे सरकारला वाटतेः दिल्ली हायकोर्ट
पुणे पोलिसांचा भयंकर अनुभव
कामगार संघटनांचा कोहिनूर हिरा

मुंबई : महाराष्ट्रातील सरकार पाडण्याचा भाजपचा डाव असल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून होऊ लागला आहे.

कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे आणि कॉँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी, शिवसेनेचे आमदार पळवून नेणे हा भाजपचा डाव असल्याचे म्हटले आहे. राष्ट्रवादीशी संलग्न असणारे आमदार देवेंद्र भुयार यनीही हा भाजपचा डाव असल्याचे म्हटले आहे.

  • आपल्याला संपर्क करण्यात आला आणि मंत्रीपदासह आणखी लालूच दाखवण्यात आली, असा आरोप अपक्ष आमदार देवेंद्र भुयार यांनी केला.
  • कॉँग्रेसची संह्याद्री अतिथी गृहावर बैठक सुरू झाली आहे.
  • राष्ट्रवादी कॉँग्रेसची बैठक यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये बैठक सुरू झाली. राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, जयंत पाटील, छगन भुजबळ यांची उपस्थिती.
  • गुवाहाटीमध्ये एकनाथ शिंदे यांचे ४२ आमदारांसह शक्तीप्रदर्शन.
  • मेघालयाचे मुख्यमंत्री कोनराड संगमा यांची आसाममध्ये हॉटेल रॅडीसन ब्ल्यूमध्ये भेट.
  • आम्हाला महाराष्ट्रातून पळवून नेण्यात आल्याचे शिवसेनेचे आमदार कैलास पाटील, नितीन देशमुख यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि विधानपरिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे उपस्थित होत्या.
  • २१ आमदारांचा आमच्याशी संपर्क झालेला आहे. कोणी कितीही फोटो दाखवले तरी ते मुंबईत आल्यावर आमच्याकडे येतील. सरकार मधून बाहेर पडायचे असल्यास २४ तासांत मुंबईत येऊन आमदारांनी सांगावे. शिवसेना सरकारमधून बाहेर पडण्यास तयार आहे, असे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सांगितले.
  • कृषि मंत्री दादा भुसे आणि
  • आधी महाविकास आघाडीतून बाहेर पडा, मगच चर्चा करू, अशी भूमिका एकनाथ शिंदे गटाने घेतली.
  • विनोद आगरवाल यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत त्यांच्या सागर या बंगल्यावर भाजपमध्ये प्रवेश केला.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0