सरकारमधून बाहेर पडण्यास तयार – राऊत

सरकारमधून बाहेर पडण्यास तयार – राऊत

मुंबई : सर्व आमदारांची इच्छा असल्यास शिवसेना महाविकास आघाडीतून बाहेर पडण्यास तयार आहे, असे शिवसेना नेते संजय राऊत यांनी सांगितले. वर्षा या मुख्यमंत

छोटे व मध्यम उद्योजकांना आता १ लाख कोटीचे पॅकेज
आमदाराच्या मुलाला समज देणाऱ्या महिला पोलिसाची बदली
अशोक स्तंभाच्या नव्या प्रतिकृतीत बदल; सरकारवर संताप

मुंबई : सर्व आमदारांची इच्छा असल्यास शिवसेना महाविकास आघाडीतून बाहेर पडण्यास तयार आहे, असे शिवसेना नेते संजय राऊत यांनी सांगितले.

वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या सरकारी निवासस्थानी पत्रकार परिषद झाली. त्यामध्ये राऊत बोलत होते.

राऊत म्हणाले, “२१ आमदारांचा आमच्याशी संपर्क झालेला आहे. कोणी कितीही फोटो दाखवले तरी ते मुंबईत आल्यावर आमच्याकडे येतील. सरकार मधून बाहेर पडायचे असल्यास २४ तासांत मुंबईत येऊन आमदारांनी सांगावे. शिवसेना सरकारमधून बाहेर पडण्यास तयार आहे. ”

शिवसेनेच्या आमदारांनी उद्धव ठाकरे यांच्या समोर ही भूमिका मांडल्यास त्याचा विचार करण्यास शिवसेना तयार आहे, असे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सांगितले.

शिवसेनेने अशी भूमिका घेतल्याचे माहीत नसल्याचे कॉँग्रेस नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.

राष्ट्रवादी कॉँग्रेसची भूमिका संध्याकाळी बैठकीत ठरणार असल्याचे, राष्ट्रवादीचे नेते खासदार प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले. आमचा प्रयत्न ही आघाडी आणि सरकार टिकवण्याचे आहे, असे पटेल म्हणाले.

कॉँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले म्हणाले की केंद्र सरकारने महाराष्ट्रात सरकार पाडण्याची अग्निपथ योजना आणली आहे. भाजपने आता पुढे यावे, असे पटोले म्हणाले. या संगळ्यामध्ये इडीचा रोल असल्याचे त्यांनी सांगितले.

आम्हाला महाराष्ट्रातून पळवून नेण्यात आल्याचे शिवसेनेचे आमदार कैलास पाटील, नितीन देशमुख यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि विधानपरिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे उपस्थित होत्या.

कैलास पाटील म्हणाले, “आम्हाला मतदान झाल्यावर ठाण्याच्या महापौर बंगल्यावर नेमयात आले. पुढे गुजरातमध्ये नेण्यात आले. माझ्या मनात पाल चुकचुकली. नाकाबंदी लागली. तिथे फायदा घेऊन उतरलो थोडे चाललो. मोटर सायकलवरून लिफ्ट घेतली. पुढे ट्रकमधून लिफ्ट घेतली. पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना फोन केला. दहिसरपर्यंत आलो. तिथे पक्ष प्रमुखांनी गाडी पाठवली आणि मुंबईत आलो.” अनेकजणांना अजून यायचे आहे, पण त्यांना शक्य होत नसल्याचे पाटील यांनी सांगितले.

नितीन देशमुख म्हणाले, “आम्हाला विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर एकनाथ शिंदे यांनी बंगल्यावर बोलावले. गाडी ठाण्याकडे नेण्यात आली. पुढे पालघरला नेण्यात आली आणि गुजरातकडे नेण्यात आले. सूरतमध्ये साडेतीनशे पोलीस आले होते. पोलीस भाजप कार्यकर्ते असल्यासारखे वागत होते. मी पावसात हॉटेलमधून बाहेर पडलो. मात्र पोलिसांनी उचलून सरकारी हॉस्पिटलमध्ये टाकले. माझ्या घातपात करण्याचे षडयंत्र रचण्यात आले. २५ जणांनी पकडून गुंगीचे इंजेक्शन देण्यात आले. मग मी सरळ हॉटेलमध्ये गेलो आणि पुढे गुवाहाटीमध्ये गेलो आणि पुढे परत महाराष्ट्रात परतलो.”

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0