‘राम मंदिर आंदोलन स्वातंत्र्य आंदोलनापेक्षा मोठे’

‘राम मंदिर आंदोलन स्वातंत्र्य आंदोलनापेक्षा मोठे’

नवी दिल्लीः राम मंदिर आंदोलन हे स्वातंत्र्य चळवळीपेक्षा मोठे व व्यापक होते, असे वक्तव्य विश्व हिंदू परिषदेचे संयुक्त महासचिव सुरेंद्र जैन यांनी रविवार

अयोध्येत तिरंगा फडकवत मशिदीचे काम सुरू
रामजन्मभूमी-बाबरी मशीद खटल्याची सुनावणी पूर्ण
अयोध्या खटला : मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड न्यायालयात जाणार

नवी दिल्लीः राम मंदिर आंदोलन हे स्वातंत्र्य चळवळीपेक्षा मोठे व व्यापक होते, असे वक्तव्य विश्व हिंदू परिषदेचे संयुक्त महासचिव सुरेंद्र जैन यांनी रविवारी केले. १९४७मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळाले पण राम मंदिर आंदोलनाच्या माध्यमातून देशाला धार्मिक व सांस्कृतिक स्वातंत्र्य मिळाले. हे स्वातंत्र्य चळवळीपेक्षा अधिक मोठे आंदोलन होते, असे जैन म्हणाले. ते पुढे असेही म्हणाले की, राम मंदिराने रामराज्य युगाची सुरूवात झाली व राम मंदिर तयार झाल्यानंतर भारताचे भाग्य अधिक उज्ज्वल असेल

जैन यांचे हे विधान विहिंपने एका पत्रकाद्वारे प्रसिद्धीस दिले आहे.

जैन म्हणाले, हे शतक रामाचे आहे. राम मंदिर निर्माणासाठी देशभर वर्गणी केली जात असल्याने देशभर एकतेचे पूल बांधले गेले. यातून असे स्पष्ट दिसून आले की रामच देशामध्ये एकजूट तयार करू शकतात. धर्मनिरपेक्ष राजकारणाने देशाचे विभाजन झाले.

या दरम्यान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संयुक्त महासचिव अरुण कुमार यांनी ‘सब के राम’ या शीर्षकाच्या एका पुस्तकाचे प्रकाशन केले. या प्रसंगी केलेल्या भाषणात अरुण कुमार यांनी राम मंदिर आंदोलनाने हिंदू समाजाला जागृत केले. हे आंदोलन हिंदुंसाठी आत्मानुभूतीचा क्षण बनला असे विधान केले. जे लोक हिंदुत्वाची भावना संपल्याचे म्हणत आहेत, त्यांच्या या शंकेचे उत्तर राम मंदिर निर्माणाच्या देणगीतून मिळत असून राम मंदिरामुळे हिंदू समाजामध्ये जागृती आली. हे आंदोलन कोणत्याही घटनेची प्रतिक्रिया नव्हती तर हिंदूंचे मंदिर व्हावे अशी त्यामागे इच्छा होती, असे अरुण कुमार म्हणाले. आमचा समाज सौहार्दपूर्ण आहे. आमची सहनशीलता भयातून आलेली नाही तर ती साहस व उद्योगशीलतेमुळे आली असल्याचाही दावा अरुण कुमार यांनी केला.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0