भाजपाचे धनंजय महाडिक विजयी, संजय पवार पराभूत

भाजपाचे धनंजय महाडिक विजयी, संजय पवार पराभूत

दुसऱ्या पसंतीच्या मतांवर भाजपचे संजय महाडीक निवडून आले त्यांनी शिवसेनेचे उमेदवार संजय पवार यांच्यापेक्षा जास्त मते घेतली.

महाराष्ट्रातील राज्यसभेच्या ६ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत भाजपने आपला तिसरा उमेदवार निवडून आणला, तर महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांचे प्रत्येकी एक उमेदवार निवडून आले. अतिरिक्त मतांच्या जोरावर शिवसेनेने उभे केलेले संजय पवार यांचा पराभव झाला.

पहिल्या पसंतीची महाविकास आघाडीची ३३ मतं संजय पवारांना मिळाली आणि भाजपाचे उमेदवार धनंजय महाडिक यांना पहिल्या क्रमाकांची २७ मतं मिळाली. मात्र दुसऱ्या पसंतीच्या आकडेमोडीवर धनंजय महाडिक यांचा विजय झाला आहे,

मतांवर आक्षेप आल्यानंतर थांबलेली मतमोजणी मध्यरात्री उशीरा सुरू झाली. केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांचे मत बाद ठरवण्याचा निर्णय दिल्यानंतर मतमोजणी सुरू झाली.

त्यामध्ये शिवसेनेचे संजय राऊत यांना ४१, राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल यांना ४३, कॉँग्रेसचे इम्रान प्रतापगढी यांना ४४ इतकी मते मिळाली. भाजपचे पीयूष गोयल यांना ४८ आणि डॉ. अनिल बोंडे यांना ४८ मते मिळाली. त्यामुळे भजपचे ३ उमेदवार तर महाविकास आघाडीचे ३ उमेदवार निवडून आले.

राज्यसभेच्या ६ जागांसाठी शुक्रवारी मतदान झाले. या निवडणुकीतील महाविकास आघाडीच्या ३ आमदारांच्या मतांवर भाजपने तर भाजपच्या २ मतांवर शिवसेनेने आक्षेप घेतला होतं.  त्यामुळे मतमोजणीची प्रक्रिया थांबली होती.

शिवसेनेचे सुहास कांदे, राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड आणि कॉँग्रेसच्या यशोमती ठाकूर यांनी आपले मतदान पक्षाच्या प्रतिनिधींच्या हातात दिल्याचा आणि त्यामुळे निवडणूक प्रक्रियेचे उल्लंघन झाल्याचा आक्षेप भाजपने घेतला. ती ३ मते बाद करावीत, अशी मागणी भाजपने केली. केंद्रीय निवडणूक आयोगाकडे भाजपने शिष्ठमंडळ नेऊन निवेदन दिले.

भाजपला पाठिंबा देणारे आमदार रवी राणा यांनी मतदान करताना हनुमान चालीसा दाखवल्याचा आणि भाजपचे सुधीर मुनघंटीवार यांनी मतपत्रिका पक्ष प्रतिनिधीच्या हातात दिल्याचा आक्षेप शिवसेनेने नोंदवला आहे. त्यामुळे मतमोजणी थांबली होती.

राज्यसभा निवडणुकीत नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांना न्यायालयाने मतदानाला परवानगी नाकारल्याने सत्ताधारी महाविकास आघाडीची २ मते कमी झाली.

राज्यसभा निवडणुकीत महाराष्ट्र विधानसभेतील २८८ पैकी २८५ आमदारांनी मतदान केले.

COMMENTS