वरवरा राव यांना जामीन

वरवरा राव यांना जामीन

मुंबई उच्च न्यायालयाने ८१ वर्षांचे कवी वरवरा राव यांना अंतरीम जामीन सोमवारी मंजूर केला. उच्च न्यायालयाने हा जामीन ६ महिन्यांसाठी दिला आहे. जामिनाची मु

मुंबई : मरणाच्या दारात उभे असलेले शहर
भारताची वाटचाल ‘निर्वाचित हुकूमशाही’कडे!
‘ओपन’ व्यापार आणि मानवी प्रगती

मुंबई उच्च न्यायालयाने ८१ वर्षांचे कवी वरवरा राव यांना अंतरीम जामीन सोमवारी मंजूर केला. उच्च न्यायालयाने हा जामीन ६ महिन्यांसाठी दिला आहे. जामिनाची मुदत संपल्यानंतर राव हे पोलिसांकडे समर्पण करू शकतात किंवा जामिनाची मुदत वाढवून घेण्यासाठी पुन्हा अर्ज करू शकतात, असे न्यायालयाने आपल्या आदेशात म्हंटले आहे.

वरवरा राव यांना ऑगस्ट २०१८ मध्ये भीमा-कोरेगाव आणि एल्गार परिषद प्रकरणामध्ये अटक करण्यात आली होती. तेंव्हापासून ते तुरुंगामध्ये होते. या प्रकरणाची सुनावणी अजून सुरू झालेली नाही.

राव हे मुंबईमध्येच राहतील आणि तपासासाठी उपलब्ध राहतील, या अटीवर जामीन देण्यात आला आहे. तसेच त्यांना ५० हजार रुपयांची वैयक्तिक हमी देण्यास आणि ‘एनआयए’ न्यायालयात उपस्थित राहण्यास न्यायालयाने सांगितले आहे. मात्र ते ‘एनआयए’ न्यायालयात स्वतः उपस्थित न राहण्याची सवलत मिळविण्यासाठी ते ‘एनआयए’ न्यायालयात अर्ज करू शकतील.

राव सध्या आजारी असून, ते नानावटी रुग्णालयात आहेत. त्यांची आज सुटका होऊ शकते.