पक्ष सहकार्याने कट रचलाः भाजप नेत्या पामेलाचा आरोप

पक्ष सहकार्याने कट रचलाः भाजप नेत्या पामेलाचा आरोप

कोलकाताः अमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी अटकेत असलेल्या प. बंगालमधील भाजप युवा शाखेच्या प्रदेश सचिव पामेला गोस्वामी यांनी शनिवारी आपल्याविरोधात आपल्याच पक

जागतिक तापमानवाढ आणि फॅसिझमचा फास
भाजपचा यू टर्न : ‘कुंभ मेळा प्रतिकात्मक ठेवा’
वाळू वेगाने खाली यावी…

कोलकाताः अमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी अटकेत असलेल्या प. बंगालमधील भाजप युवा शाखेच्या प्रदेश सचिव पामेला गोस्वामी यांनी शनिवारी आपल्याविरोधात आपल्याच पक्षातील एक सहकारी राकेश सिंह यांनी षडयंत्र रचल्याचा आरोप केला. त्यांनी या प्रकरणाची सीआयडी चौकशी करावी व राकेश सिंह यांना अटक करावी अशीही मागणी केली आहे.

शुक्रवारी पामेला गोस्वामी, त्यांचे मित्र प्रबीर कुमार डे व पामेला यांचा खासगी सुरक्षा रक्षक या तिघांना अमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी कोलकातातील न्यू अलिपूर भागातून अटक करण्यात आली होती. पामेला यांना २५ फेब्रुवारी पर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे. पामेला यांच्या बॅगेत व कारमध्ये ९० ग्रॅम कोकेन होते. याची किंमत लाखो रुपये असल्याचा पोलिसांचा दावा आहे.

शनिवारी त्यांना तुरुंगात नेत असताना पत्रकारांशी बोलताना पामेला यांनी भाजपचे प्रदेश समितीचे एक सदस्य राकेश सिंह जो प. बंगालचे प्रभारी व खासदार कैलाश विजयवर्गीय यांच्या निकटचा आहे, त्याने आपल्याविरोधात कट रचल्याचा आरोप केला व त्यांना तत्काळ अटक करावी अशी मागणी केली.

त्यावर राकेश सिंह यांनी कोलकाता पोलिस व तृणमूल काँग्रेसच्या सरकारने पामेला यांना चिथावल्याचा आरोप केला आहे. आपण एक वर्षाहून अधिक काळ पामेला यांच्या संपर्कात नाही, आपली कोणतीही चौकशी करावी, अशी प्रतिक्रिया राकेश सिंह यांनी दिली आहे.

‘पामेला यांना अमली पदार्थाचे व्यसन

दरम्यान, कोलकाता पोलिसांनी पामेला यांना अमली पदार्थाचे व्यसन असल्याचा दावा केला आहे. पामेला यांचे वडील कौशिक गोस्वामी यांनी गेल्या वर्षी आपल्या मुलीविरोधात तक्रार केली होती. आपल्या मुलीला तिच्या मित्रांच्या संगतीने अमली पदार्थाचे व्यसन लागले असून तिच्यावर देखरेख ठेवावी अशी तक्रार केल्याचे कोलकाता पोलिसांनी सांगितले. पामेला व त्यांच्या मित्रांवर पोलिसांनी वर्षभर नजर होती. पामेला प्रबीर कुमार डे सोबत राहात होत्या. त्यामुळे या दोघांना अटक केल्याचे पोलिसांनी सांगितले.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0