मुंबईत ३ ते २५ मार्चपर्यंत अर्थसंकल्पीय अधिवेशन

मुंबईत ३ ते २५ मार्चपर्यंत अर्थसंकल्पीय अधिवेशन

मुंबई: महाराष्ट्र विधानमंडळाचे २०२२चे पहिले (अर्थसंकल्पीय अधिवेशन) मुंबईत गुरुवार ३ मार्च २०२२ रोजी सुरू होणार असून ते २५ मार्च २०२२ पर्यंत चालेल. या

मोदींच्या लाल किल्ल्यावरच्या भाषणातून काय मिळालं?
विरोधकांची अनुपस्थिती; ७ विधेयके ४ तासात संमत
जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुका स्थगित

मुंबई: महाराष्ट्र विधानमंडळाचे २०२२चे पहिले (अर्थसंकल्पीय अधिवेशन) मुंबईत गुरुवार ३ मार्च २०२२ रोजी सुरू होणार असून ते २५ मार्च २०२२ पर्यंत चालेल. या काळात ११ मार्चला २०२२-२३ या वर्षाचा राज्याचा अर्थसंकल्प मांडण्यात येईल. बुधवारी हा निर्णय विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात आला.

अधिवेशनाच्या सुरुवातीला कोविडच्या पार्श्वभूमीवर नियमांचे पालन करून सर्व विधान मंडळ सदस्यांना आरटीपीसीआर चाचणी करणे बंधकारक आहे तसेच कोरोना प्रतिबंधक लसीच्या दोन्ही मात्रा घेतल्याचे प्रमाणपत्र असणे आवश्यक असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.

विधीमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या या बैठकीला विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ,  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (ऑनलाईन उपस्थित) उपमुख्यमंत्री अजित पवार, उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, संसदीय कार्यमंत्री ॲड. अनिल परब, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, इतर मागास बहुजन कल्याण विभाग मंत्री विजय वडेट्टीवार, संसदीय कार्य राज्यमंत्री संजय बनसोडे, विधानपरिषद आणि विधानसभा कामकाज सल्लागार समितीचे सदस्य वित्त विभागाचे प्रधान सचिव नितीन गद्रे, विधान मंडळाचे सचिव राजेंद्र भागवत आदी उपस्थित होते.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0