रायगडमधील ‘बल्क ड्रग पार्क’ गुजरातमध्ये गेलाः आदित्य ठाकरे

रायगडमधील ‘बल्क ड्रग पार्क’ गुजरातमध्ये गेलाः आदित्य ठाकरे

मुंबईः महाराष्ट्रातला १ लाख ६६ हजार कोटी रु.चा वेदांत-फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातकडे गेल्यानंतर आता रायगडमध्ये प्रस्तावित सुमारे ७७ हजार रोजगार देणारा बल्

मोहम्मद अखुंड अफगाणिस्तानचे काळजीवाहू पंतप्रधान
फिरोजाबादमध्ये डेंग्युसदृश तापाने ३२ मुलांचा मृत्यू
आज आणि उद्या दिल्लीत ‘अधांतर’चे प्रयोग

मुंबईः महाराष्ट्रातला १ लाख ६६ हजार कोटी रु.चा वेदांत-फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातकडे गेल्यानंतर आता रायगडमध्ये प्रस्तावित सुमारे ७७ हजार रोजगार देणारा बल्क ड्रग पार्कही राज्याच्या हातातून निसटून गुजरातला गेल्याचा आरोप शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी केला. हा प्रकल्प गुजरातमधील भरूचमध्ये उभा राहणार असून केंद्र सरकारने गुजरात, आंध्र प्रदेश व हिमाचल प्रदेश या राज्यांना बल्क ड्रग पार्कविषयी विचारणा केली असल्याचा दावा आदित्य ठाकरे यांनी केला.

बुधवारी एक पत्रकार परिषद घेत आदित्य ठाकरे यांनी या प्रकरणाच्या निमित्ताने एकनाथ शिंदे-भाजप सरकारवर जोरदार टीका केली आहे. राज्याचे उद्योगमंत्र्यांना या संदर्भात काही माहिती आहे की नाही असा सवालही त्यांनी केला.

आदित्य ठाकरे म्हणाले, रायगडमध्ये मुरुड-रोहा तालुक्यातले प्रस्तावित बल्क ड्रग पार्क मुंबई कॉरिडॉर अंतर्गत उभारण्यात येणार होते. त्यासाठी ५ हजार एकर जमीन आवश्यक होती, त्यातील अडीच हजार एकर जमीन जागा १७ गावांतून संपादित केली जाणार होती. तर एक हजार एकर जमीन सरकारच्या मालकीची होती. या पार्कसाठी जमीन अधिग्रहणाचे कामही सुरू झाले होते. राज्याच्या ६२ व्या वर्धापनदिनानिमित्त राज्यपालांनी केलेल्या भाषणात याचा पार्कचा उल्लेखही होता. या पार्कच्या माध्यमातून वैद्यकीय सोयी उपलब्ध होणार होत्या व शिवाय ३० हजार कोटी रु.ची गुंतवणूक होणार होती. त्यासाठी तत्कालिन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधानांना एक पत्र लिहिले होते. मविआच्या मंत्रिमंडळ बैठकीत या प्रस्तावाला मंजुरीही मिळाली होती. केंद्राच्या परवानगी शिवाय एकही गुंतवणूक येऊ शकत नाही, अशा वेळी बल्क ड्रग प्रकल्प गुजरातला गेला याची माहिती सामंत यांना आहे का, असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केला.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0