नवी दिल्ली : नागरिकत्व दुरुस्ती कायदा (सीएए) व कलम ३७० रद्द केल्यामुळे त्यावर कितीही विरोध असला तरी देशहिताच्या दृष्टीने हे दोन्ही निर्णय मागे घेतले ज
नवी दिल्ली : नागरिकत्व दुरुस्ती कायदा (सीएए) व कलम ३७० रद्द केल्यामुळे त्यावर कितीही विरोध असला तरी देशहिताच्या दृष्टीने हे दोन्ही निर्णय मागे घेतले जाणार नाही, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचा लोकसभा मतदारसंघ वाराणसीत रविवारी स्पष्ट केले. सुमारे १२०० कोटी रु.च्या ५० विविध योजनांचे भूमीपूजन मोदी यांच्या हस्ते रविवारी झाले. त्यावेळी बोलताना मोदींनी कित्येक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मुद्द्यांवर महाकालच्या आशीर्वादाने निर्णय घेण्यास आपण सक्षम झालो असल्याचे म्हटले.
काश्मीरसंदर्भातील कलम ३७० असो की सीएए असो हे दोन्ही निर्णय घेतल्यानंतर सरकारवर मोठ्या प्रमाणात दबाव आणला गेला पण हे निर्णय देशहितासाठी घेण्यात आले होते. आता कितीही दबाव आला तरी ते मागे घेतले जाणार नाहीत. महाकालच्या आशीर्वादाने आम्ही हे निर्णय घेतले आहेत ते पुढे कायम राहतील. अयोध्येतील राम मंदिराच्या कामासाठी ट्रस्ट स्थापन केला आहे, या कामाला लवकरच गती मिळेल असे ते म्हणाले.
COMMENTS