१ एप्रिलपासून एनपीआर; राष्ट्रपतींचे पहिले नाव नोंदवणार

१ एप्रिलपासून एनपीआर; राष्ट्रपतींचे पहिले नाव नोंदवणार

नवी दिल्ली : बहुचर्चिच राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणीला (एनपीआर) एक एप्रिलपासून सुरवात होत असून देशाचे पहिले नागरिक म्हणून राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांचे

भाजपने नुकसान केले, पण अनपेक्षित चमत्कारही घडवले
नागरिकत्वाचा मुद्दा पेटला, पुढे काय? – भाग २
देशद्रोह म्हणजे नेमके काय?

नवी दिल्ली : बहुचर्चिच राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणीला (एनपीआर) एक एप्रिलपासून सुरवात होत असून देशाचे पहिले नागरिक म्हणून राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांचे नाव एनपीआरमध्ये प्रथम नोंदवले जाणार आहे. नवी दिल्ली महानगरपालिकेकडून ही नोंदणी केली जाणार आहे.

एनपीआरमध्ये राष्ट्रपतींचे नाव नोंद झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू यांचे नाव त्याचदिवशी नोंदवले जाणार आहे. या तीन घटनात्मक प्रमुखांची वेळ राष्ट्रीय नोंदणी कार्यालयाने मागितली असून त्यांच्या वेळेनुसार या तिघांची नावे एनपीआरमध्ये समाविष्ट केली जाणार आहेत.

एनपीआरवर काही राज्यांनी आक्षेप घेतला आहे. एनपीआर हे एनसीआरची पार्श्वभूमी असल्याचे कारण दाखवत ही नोंदणी आमच्या राज्यात केली जाणार नाही असा ठराव केरळ विधानसभेने देशात पहिला मांडला होता. त्यानंतर काँग्रेस शासित राज्यांनीही केरळचा कित्ता गिरवला होता. प. बंगालनेही एनपीआरला विरोध केला आहे.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0