‘कोरोना आटोक्यात आल्यानंतर सीएए लागू’

‘कोरोना आटोक्यात आल्यानंतर सीएए लागू’

सिलिगुडीः कोरोनाच्या महासाथीमुळे देशभर नागरिकत्व दुरुस्ती कायदा (सीएए) लागू करण्यात आला नव्हता पण या कायद्याची अंमलबजावणी लवकरच करण्यात येईल असे भाजपच

राज्यपाल नियुक्त सदस्य निवडीचा गुंता वाढला
भाजपच्या टी. राजा सिंग यांना फेसबुकवर बंदी
नेहरु जयंतीला लोकसभा अध्यक्ष, उपराष्ट्रपती, मंत्री अनुपस्थित

सिलिगुडीः कोरोनाच्या महासाथीमुळे देशभर नागरिकत्व दुरुस्ती कायदा (सीएए) लागू करण्यात आला नव्हता पण या कायद्याची अंमलबजावणी लवकरच करण्यात येईल असे भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा यांनी सोमवारी येथे झालेल्या एका सभेत सांगितले.

पक्षाच्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना नड्डा यांनी तृणमूल काँग्रेसच्या फोडा व झोडा या राजकारणावर टीका करत पुढील वर्षी प. बंगालमधील सरकार भाजपचेच असेल असा विश्वास व्यक्त केला. ममता बॅनर्जी यांच्या सरकारच्या काळात हिंदू विरोधी निर्णय घेतले गेले, असा आरोपही त्यांनी केला. समाजात फूट पाडण्याचे प्रयत्न या सरकारकडून सातत्याने केले गेले, मतांचे राजकारण व सत्ता यासाठी हे सरकार प्रयत्नशील असल्याचीही टीका त्यांनी केली.

प. बंगालमध्ये पुढील वर्षी विधानसभा निवडणूका होत असून भाजपने आपली तयारी सुरू केली आहे. त्या दृष्टीने नड्डा प. बंगालच्या दौर्यावर आले होते.

नड्डा म्हणाले, सीएए लागू होणे गरजेचे आहे आणि ते होणारच आहे. काही नियम बनवले जात आहेत. कोरोना महासाथीमुळे काम थांबले होते. जसजसे कोरोनाची महासाथ आटोक्यात येईल तसे हा कायदा राबवण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू होतील, हे काम आम्ही पुर्ण करणार आहोत, असा विश्वासही त्यांनी पक्ष कार्यकर्त्यांना दिला.

नड्डा म्हणाले, केंद्राची शेतकरी सन्मान योजना प. बंगालने राबवली नाही. त्यामुळे या राज्यातील ७६ लाख शेतकरी या योजनेपासून वंचित आहेत. शिवाय केंद्राच्या आयुष्यमान योजनांचाही त्यांना मिळत नाही. आपण सर्वांनी कमळाचे बटण दाबल्यास आम्ही आयुष्यमान भारताचे बटन दाबू व ही योजना गरजूंना मिळेल, असे आश्वासन त्यांनी दिले.

२०१९मध्ये संसदेत सीएए कायदा संमत होण्याअगोदर प. बंगालमध्ये या कायद्याविरोधात सत्ताधारी तृणमूल काँग्रेसने आघाडी उघडली होती. गेल्या १८ जूनला सरकार हा कायदा अंमलात आणणार होते पण ते शक्य झालेले नाही.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0