भाजप नेत्याच्या गोशाळेत शेकडो गायी मृत

भाजप नेत्याच्या गोशाळेत शेकडो गायी मृत

भोपाळः शहरानजीक बैरसिया भागातल्या बसई या गावांत एका गोशाळेतल्या शेकडो गायी मरण पावल्याची घटना उघडकीस आली आहे. या संदर्भात पोलिसांनी या गोशाळेच्या संचा

मनपरिवर्तनः भाजप खासदाराचा राजीनामा मागे
‘द्र’ – दिल्लीतला आणि मुंबईतला
ड्रग्ज पार्टी : एनसीबीच्या धाडीत भाजपचा कार्यकर्ता

भोपाळः शहरानजीक बैरसिया भागातल्या बसई या गावांत एका गोशाळेतल्या शेकडो गायी मरण पावल्याची घटना उघडकीस आली आहे. या संदर्भात पोलिसांनी या गोशाळेच्या संचालक निर्मला देवी शांडिल्य यांच्याविरोधात फिर्याद दाखल केली आहे. भोपाळ जिल्हाधिकाऱ्यांनीही चौकशीचे आदेश दिले आहेत. गायींचे पोस्टमार्टम करून मृत्यूमागचे कारणही शोधण्याचे व गोशाळेचा ताबा घेण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आलेले आहेत.

शांडिल्य या भाजपच्या स्थानिक नेत्या असून गेले २० वर्षे त्या ही गोशाळा सांभाळत आहेत.

शांडिल्य यांच्या गोशाळेतल्या मृत गायींचे व्हीडिओ ट्विटरवर व्हायरल झाले आहेत. एका व्हीडिओत एका खड्ड्यात काही मृत गाय दिसत असून माळरानावर तर अनेक मृत गायी दिसत आहेत. काही ठिकाणी गायींचे सापळेही दिसत आहेत.

शांडिल्य यांच्या गोशाळेत मृत्यूमुखी पडलेल्या गायींच्या संख्येबद्दल वाद निर्माण झाला असून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी या गोशाळेतल्या ५००हून अधिक गायी मरण पावल्याचा दावा केला आहे.

दैनिक भास्करने दिलेल्या वृत्तानुसार रविवारी शांडिल्य यांच्या गोशाळेतल्या एका विहिरीत २० मृत गायी, मैदानात ८० हून अधिक मृत गायी व सापळे मिळाले. या आधी २९ जानेवारीला काही गायी मरण पावल्या होत्या, असे निदर्शनास आले होते.

एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार गायींच्या मृत्यूनंतर स्थानिक रहिवाशांनी गोशाळेपुढे निदर्शने करण्यात सुरूवात केली. काही ग्रामस्थांनी गोशाळेच्या मुख्य संचालकांवर कारवाई करावी अशीही मागणी केली आहे. धनश्याम गुप्ता या ग्रामस्थाने ही गोशाळा एक रॅकेट असून गायींना मारून त्यांच्या कातड्याची व हाडांची विक्री केली जात असल्याचा आरोप केला.

शांडिल्य यांची गोशाळा १० एकर जमिनीवर असून ही जमीन सरकारी आहे. त्यांनी या जमिनीवर अतिक्रमण करून चोहोबाजूंनी ताराही लावल्या आहेत. या गोशाळेत आसपासच्या गावातल्या गायींना सोडण्यात येते. या गायींची सेवा केल्यास सरकारकडून १००-२०० रु.चे अनुदान मिळते. पण आपल्याला एका गायीची सेवा केल्यास प्रशासनाकडून दीड रुपया मिळतो, तोही दीड-दोन वर्षानंतर मिळतो, अशी प्रतिक्रिया शांडिल्य यांनी दिली. एवढ्या कमी पैशात गायींचा सांभाळ करता येत नाही पण आपण आपल्या पातळीवर गायीची सेवा करत असल्याचे शांडिल्य यांचे म्हणणे आहे.

गायींचा मृत्यू थंडीमुळे झाला असेही एक कारण सांगितले जात आहे. यावर शांडिल्य म्हणाल्या, या जागेवर आपण शेड बांधले होते पण प्रशासनाने ते काढून टाकले. आसपासच्या गावातले लोक आजारी गायींना येथे सोडून जातात. ज्या मृत गायी दिसत आहेत त्या आजारापणामुळे मेलेल्या असून या गायी आमच्या गोशाळेतील नाहीत तर बाहेरच्या लोकांच्या आहेत. काही ग्रामस्थ आमच्या गोशाळेवर निशाणा साधत आहेत, कारण येथे चालणारा जुगार व दारुचा अवैध धंदा आपण बंद केल्याचा दावा शांडिल्य यांनी केला. आपण कोणत्याही चौकशीला सामोरे जाऊ असेही त्या म्हणाल्या.

छायाचित्र – प्रतीकात्मक, रॉयटर्स

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0