राजस्थानात दलिताला माफीसाठी नाक घासायला लावले

राजस्थानात दलिताला माफीसाठी नाक घासायला लावले

नवी दिल्लीः द काश्मीर फाइल्स या चित्रपटावरच्या चर्चेत सोशल मीडियावर हिंदू देवदेवतांवर टीका टिपण्णी करणाऱ्या एका दलित व्यक्तीला मंदिराच्या पायऱ्यांवर न

बौद्ध की महार वाद : स्वाभिमान हवा की सवलती ?
‘सिरीयस’, ‘कॅज्युअल’ आणि जातीची जाणीव
जात नको आर्थिक निकषावर आरक्षण मागा – केरळच्या न्यायाधीशांचे ब्राह्मणांना आवाहन

नवी दिल्लीः द काश्मीर फाइल्स या चित्रपटावरच्या चर्चेत सोशल मीडियावर हिंदू देवदेवतांवर टीका टिपण्णी करणाऱ्या एका दलित व्यक्तीला मंदिराच्या पायऱ्यांवर नाक घासण्याची सक्ती करण्याची घटना राजस्थानात अलवार जिल्ह्यात उघडकीस आली आहे. पोलिसांनी या संदर्भात ११ जणांवर फिर्याद दाखल करण्यात आली आहे.

राजेश कुमारे मेघवाल असे या पीडित दलित व्यक्तीचे नाव असून ते एका खासगी बँकेत काम करतात. त्यांनी काही दिवसांपूर्वी द काश्मीर फाइल्स या चित्रपटावर सोशल मीडियात एक मजकूर लिहिला होता. यावरून वाद निर्माण झाला होता. मेघवाल यांनी आपल्या मजकूरात आजपर्यंत अन्य जाती-धर्मांवर झालेल्या छळाबद्दल विचारणा केली होती. यातून वाद वाढत गेला. काही जणांनी मेघवाल यांच्या मजकुराला उत्तर देताना जय श्री राम, जय श्री कृष्ण असे म्हटले होते. यावर मेघवाल यांनी टीकाटिपण्णी केली. त्याचा राग येऊन गावातल्या काही जणांनी मेघवाल यांना गावातल्या एका मंदिराच्या दारात नाक घासण्याची सक्ती केली. या संदर्भातला एक व्हीडिओही सोशल मीडियात व्हायरल झाला. मेघवाल यांनी देवीदेवतांची माफी मागावी अशी काही जणांची मागणी होती.

दरम्यान या घटनेवरून बहुजन समाज पार्टीच्या अध्यक्षा मायावती यांनी राजस्थानमधील काँग्रेस सरकारच्या नाकर्तेपणावर टीका केली आहे. या सरकारच्या काळात राजस्थानमध्ये आदिवासी व दलितांवर मोठ्या प्रमाणावर अत्याचार होत असून सरकार निष्क्रीय असल्याचा आरोप मायावतींनी केला. या सरकारला केंद्राने त्वरित बरखास्त करावे व तेथे राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी मागणी त्यांनी केली आहे.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0