समुपदेशन कीटमध्ये रबरी लिंग वापरल्यामुळे वाद

समुपदेशन कीटमध्ये रबरी लिंग वापरल्यामुळे वाद

नवी दिल्लीः ग्रामीण भागात लैंगिक शिक्षणाच्या प्रसारासाठी रबरी लिंग वापरण्याच्या महाराष्ट्र सरकारच्या धोरणावर विरोधकांनी टीका केली आहे. राज्य सरकारने क

फेसबुकचे अल्गोरिदम भाजपच्या ध्रुवीकरणाच्या राजकारणाला अनुकूल
परंपरेला स्वीकार नकार, देतच आपण पुढे जात असतो : जयंत पवार (भाग – २)
एनआरसीवरून गोंधळात गोंधळ

नवी दिल्लीः ग्रामीण भागात लैंगिक शिक्षणाच्या प्रसारासाठी रबरी लिंग वापरण्याच्या महाराष्ट्र सरकारच्या धोरणावर विरोधकांनी टीका केली आहे. राज्य सरकारने कुटुंब नियोजन समुपदेशन कीटमध्ये रबरी लिंगाचा समावेश केला असून गावागावांत लैंगिक शिक्षण देण्यासाठी आशा वर्कर्सना पाठवले आहे. या महिलांच्या हातात रबरी लिंग दिल्याने त्यांना काही ठिकाणी पुरुषांच्या संतापाला तोंड द्यावे लागत आहेत. तुम्ही अशा मोहिमा हाती घेऊन आमच्या महिलांना बिघडवत आहात, अशी टीका आशा वर्कर्सना ऐकायला मिळत आहे. यामुळे काही आशा वर्कर्सनी नाराजीही व्यक्त केली आहे. तर काहींच्या मते यातून ग्रामीण व आदिवासी भागातील नागरिकांना योग्य ते समुपदेशन होत आहे.

राज्य आरोग्य खात्याच्या या मोहिमेला बुलढाणा जिल्ह्यातून काही ठिकाणी प्रतिकूल प्रतिसाद मिळत असल्याची वृत्ते आहेत. जिल्ह्यात ७ आशा सेविकांनी आम्हाला पुरुषांच्या नाराजीला तोंड द्यावे लागल्याचे सांगितले. ग्रामीण भागात लैंगिक आरोग्यावर खुली चर्चा करण्यास नागरिक तयार होत नाहीत. पण लैंगिक शिक्षणावर खुली चर्चा व्हावी असाच आमचा उद्देश असल्याने प्रयत्न सुरू असल्याचे या सेविकांचे म्हणणे आहे.

कुटुंब नियोजनाची मोहीम अधिक वेगाने चालवण्यासाठी राज्य सरकारने पहिल्यांदाच समुदेशन कीटमध्ये पुरुषाचे रबरी लिंग व महिलांच्या गर्भाशयाची प्रतिकृती वापरण्याचा निर्णय घेतला आहे. या अगोदर चित्रे, आकृतींच्या माध्यमातून ग्रामीण भागात लैंगिक शिक्षण, संतती नियमने व कुटुंब नियोजनाची माहिती दिली जायची. आता लैंगिक अवयवांची प्रतिकृती वापरल्याने काही भागात पुरुषांकडून त्याला आक्षेप घेतला जात असल्याच्या तक्रारी येत आहेत.

या संदर्भात इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना राज्य आरोग्य सेवा संचालक डॉ. अर्चना पाटील यांनी सांगितले की, असे कीट दिल्यामुळे आशा वर्कर्स कुटुंब नियोजन, गर्भधारणा, संतती नियमन, लैंगिक स्वच्छता, लैंगिक शिक्षण लोकांपर्यंत पोहचवू शकतात. या प्रकारची कीट नवदाम्पत्यांसाठी अधिक महत्त्वाच्या ठरू शकतात, त्यांच्या मध्ये जागरुकता येते. रबरी लिंग दिल्यामुळे कंडोम कसा घालायचा याची माहिती देणे सोपे पडते, असे त्या म्हणाल्या.

पण काही आशा वर्करच्या मते रबरी लिंग व गर्भाशयाच्या प्रतिकृतीमुळे चार चौघांमध्ये लाजल्यासारखे वाटण्याचे प्रकारही घडत आहे. तसेच पुरुषांची नाराजीही झेलावी लागते. यावर डॉ. अर्चना पाटील यांनी आशा सेविकांना असे विरोध झेलता यायला हवेत नाहीतर ही मोहीम यशस्वी कशी होईल असा सवाल केला आहे.

एबीपी माझा या वृत्तवाहिनीशी बोलताना बुलढाण्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.राजेंद्र सांगळे यांनी म्हटलं आहे की, राज्य शासनाच्या आरोग्य विभागाच्या वतीने जनतेला आरोग्य शिक्षण व माहिती या कार्यक्रमाअंतर्गत हा उपक्रम राबवला जातोय. कुटुंब नियोजन समुपदेशन किट आशा आणि अंगणवाडी सेविकांना प्रशिक्षणानंतर वाटप करण्यात येणार आहे. या किटमुळे ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांना लोकसंख्या नियंत्रण. लैंगिक आजार, HIV, सिफिलीस या सारख्या आजारांवर शिक्षणामुळे नियंत्रण मिळवता येणार आहे. शिवाय आपली खाजगी स्वच्छता ठेवण्यासाठी नागरिकांना समुपदेशन करण्यात येणार आहे.

भाजपचा मोहिमेला आक्षेप

दरम्यान महाराष्ट्र भाजपच्या उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी आरोग्य खात्याच्या या मोहिमेवर आक्षेप घेतला आहे. त्यांनी ट्विटरवर राज्याच्या पोलिस महासंचालकांना प्रश्न विचारला आहे, त्या ट्विटमध्ये म्हणतात, ‘बुलढाणा-कुटुंबनियोजन किटमध्ये रबरी लिंगाचा समावेश सरकारने करून त्याची जनजागृती करण्याचे काम आशा वर्करना दिलयं भारतीय दंड विधान ३५४ प्रमाणे (मनाला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य) डोक्यावर पडलेल्या या ठाकरे सरकार वर विनयभंगाचा गुन्हा तात्काळ दाखल व्हावा.’

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0