पायलटची चूक व खराब हवामानामुळे हेलिकॉप्टर कोसळले

पायलटची चूक व खराब हवामानामुळे हेलिकॉप्टर कोसळले

नवी दिल्लीः देशाच्या तिन्ही लष्करी दलाचे प्रमुख बिपिन रावत व १३ अन्य जणांचा हेलिकॉप्टर अपघातात झालेला मृत्यू पायलटच्या चुकीने व खराब हवामानामुळे झाल्य

हेलिकॉप्टर दुर्घटनेत सीडीएस बिपीन रावत यांच्यासह १३ ठार
सीडीएस नियुक्तीचे निकष केंद्राने बदलले
रावत तिन्ही दलाचे नवे प्रमुख, नरवणे नवे लष्करप्रमुख

नवी दिल्लीः देशाच्या तिन्ही लष्करी दलाचे प्रमुख बिपिन रावत व १३ अन्य जणांचा हेलिकॉप्टर अपघातात झालेला मृत्यू पायलटच्या चुकीने व खराब हवामानामुळे झाल्याचे भारतीय हवाई दलाने सांगितले. गेल्या वर्षी ८ डिसेंबरला बिपीन रावत, त्यांची पत्नी व हवाई दलातील अन्य १२ जणांना घेऊन जाणारे हेलिकॉप्टर कोसळले होते. या दुर्घटनेत १३ जणांचा जागीच मृत्यू झाला होता व अन्य एका अधिकाऱ्याचा नंतर रुग्णालयात मृत्यू झाला होता. या दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी तिन्ही दलांनी समिती नेमली होती. या तिन्ही दलांच्या समितीने आपल्या अहवालात हवामानात अचानक झालेला बदल व हेलिकॉप्टर पायलटच्या चुकीमुळे दुर्घटना घडल्याचा निष्कर्ष मांडला. खराब हवामानात हेलिकॉप्टर ढगांमध्ये फसले व त्यामुळे पायलटकडून चुका होऊन दुर्घटना घडली असे नमूद करण्यात आले आहे.

या दुर्घटनेचा तपास करण्यासाठी हेलिकॉप्टरमधील फ्लाइट डेटा रेकॉर्डर, कॉकपीट व्हाइस रेकॉर्डर यांचे विश्लेषण करण्यात आले.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0