केंद्राकडून गेल्या वर्षींच्या पिक नुकसानीची ७०० कोटींची मदत

केंद्राकडून गेल्या वर्षींच्या पिक नुकसानीची ७०० कोटींची मदत

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून राज्यातील कोकण तसेच इतर जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. यासंदर्भात राज्य सरकारतर्फे केंद

शेतकरी आत्मनिर्भरतेचे वास्तव
उ. प्रदेशः मंत्र्यांच्या मुलाच्या गाडीखाली २ शेतकरी चिरडून ठार
व्हिलेज डायरी भाग ७ : आणि न्याय

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून राज्यातील कोकण तसेच इतर जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. यासंदर्भात राज्य सरकारतर्फे केंद्राला आर्थ‍िक मदतीची विनंती करणार असून केंद्र सरकार याची योग्य ती दखल घेवून तातडीने मदत करेल अशी अपेक्षा कृषी मंत्री भुसे यांनी व्यक्त केली आहे.

राज्यात गेल्या वर्षी म्हणजे जून ते ऑक्टोबर २०२० दरम्यान झालेल्या मुसळधार पावसामुळे झालेल्या नुकसानीसंदर्भात एनडीआरएफमधून अर्थसहाय्य करण्याची विनंती राज्य सरकारने केंद्राकडे एका निवेदनाद्वारे केली होती. लोकसभेमध्ये केंद्रीय कृषीमंत्र्यांनी या अनुषंगाने पिकांच्या नुकसानीसाठी ७०१ कोटी रुपयांची मदत जाहीर केली, त्याबद्दल राज्याचे कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी धन्यवाद दिले आहेत.

गेल्या वर्षीच्या अतिवृष्टीनंतर नुकसान भरपाईपोटी ३,७२१ कोटी रु.ची मागणी राज्य सरकारने केंद्राकडे केली होती. दरम्यानच्या काळात राज्य सरकारने निर्णय घेवून ४,३७५ कोटी रु. शेतकऱ्यांना पिकांच्या नुकसानीपोटी वाटप केले. राज्याने केलेल्या ३,७२१ कोटी रुपयांच्या मागणीपैकी ७०१ कोटी रुपये मदत देण्याचे केंद्र शासनाने घोषित केले आहे, अशी माहिती दादाजी भुसे यांनी दिली.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0