गती राखता न आल्याने विक्रम लँडर चंद्रावर आदळले

गती राखता न आल्याने विक्रम लँडर चंद्रावर आदळले

नवी दिल्ली : चांद्रयान-२ मोहिमेतील विक्रम लँडर हे चंद्राच्या पृष्ठभागाच्या नजीक ५०० मीटर अंतरावर आले असताना त्याचा निश्चित केलेला वेग राखू न शकल्याने

इस्रोच्या नव्या वर्षातल्या मोहिमा – ‘चंद्रयान-३’, ‘गगनयान’
इस्रोच्या इतिहासात ‘चांद्रयान-२’ व्यतिरिक्त आणखी एका यशाची नोंद
‘विक्रम’चा पत्ता लागला : इस्रो

नवी दिल्ली : चांद्रयान-२ मोहिमेतील विक्रम लँडर हे चंद्राच्या पृष्ठभागाच्या नजीक ५०० मीटर अंतरावर आले असताना त्याचा निश्चित केलेला वेग राखू न शकल्याने ते आदळले अशी माहिती गुरुवारी पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी लोकसभेत दिली.

चंद्राच्या पृष्ठभागावर विक्रम लँडर व्यवस्थित उतरावे यासाठी इस्रोच्या नियंत्रण कक्षाने दोन टप्पे निश्चित केले होते. त्यापैकी पहिल्या टप्प्यात विक्रम लँडर चंद्राच्या पृष्ठभागापासून ३० किमी ते ७.४ किमी या अंतरात आले असता त्यांची गती १६८३ मीटर प्रती सेकंद ते १४६ मीटर प्रती सेकंद अशी निश्चित केली होती. हा टप्पा विक्रम लँडरने यशस्वीरित्या पार केला. पण दुसऱ्या टप्प्यात विक्रम लँडरची गती पुन्हा कमी होणार होती. पण ही गती कमी करण्याच्या प्रयत्नात विक्रम लँडरची निश्चित केलेली गती व प्रत्यक्षातील गती यामध्ये तफावत आल्याने हे लँडर विचलित झाले आणि ते चंद्राच्या पृष्ठभागानजीक ५०० मीटर अंतरावर आले असता त्याची गती वाढली व ते कोसळले असे जितेंद्र सिंह यांनी सांगितले.

पण चांद्रयान-२ मोहिमेची बरीच उद्दिष्ट्ये, या मोहिमेसाठीचे देशी बनावटीचे तंत्रज्ञान यांच्या चाचण्यांना यश आले असून ऑर्बिटरचे आयुष्यमान सात वर्षांपर्यंत वाढल्याचे सिंह यांनी सांगितले. या ऑर्बिटरकडून येत असलेली माहिती जमा केली जात आहे व त्याचा फायदा इस्रोला होत असल्याचेही सिंह यांनी सांगितले.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0